Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात पासपोर्ट व्हेरीफीकेशन : लाचखोर पोलीस आणि टुर्स चालकास अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात पासपोर्ट व्हेरीफीकेशन : लाचखोर पोलीस आणि टुर्स चालकास अटक

Surajya Digital
Last updated: 2022/06/27 at 8:31 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
□ लाचखोरीत दरवर्षी पोलीस ठाणे अव्वलच !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● अक्कलकोट रस्त्यावर एसटी कारचा अपघात; एक ठार तीन जखमी□ शॉर्टसर्किटमुळे ऑटोमोबाइल दुकानाला आग

□ लाचखोरीत दरवर्षी पोलीस ठाणे अव्वलच !

सोलापूर : पासपोर्ट व्हेरीफीकेशन साठी दीड हजाराची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षक टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालकास सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. Passport Verification in Solapur: Corrupt Police and Tours Driver Arrested

दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आकडेवारी प्रसिद्ध होते. यात वर्षभरात जिल्ह्यातील कोणत्या विभागातील अधिकारी कर्मचारी लाच घेताना आढळले ते प्रसिद्ध केले जाते. पूर्वी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी हे आपले अव्वल स्थान टिकवून होते. परंतु अलिकडे महसूल विभागाला ओव्हरटेक करत पोलीस खात्याने हाय विक्रम मोडीत काढत लाचखोरीत आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करताना तक्रारदाराच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी रेल्वे स्टेशन पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर (वय ३४) याने त्यांना मासिक हप्ता म्हणून १३ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपये देण्याचे ठरले आणि पोलिस चौकीतच लाचेची रक्कम स्वीकारताना क्षीरसागर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होती. तीन-चार दिवसाखालीच ही कारवाई झाली होती. त्यात आज सोमवारी ही कारवाई केलीय. यातही सहायक पोलीस उपनिरीक्षकास अटक केलीय.

सहायक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गणपत शिंदे (वय ५७ वर्षे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर), सलाहुद्दीन लायक अली मुल्ला (वय ४६ वर्षे, व्यवसाय टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स चालक) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

लाचखोर रविंद्र गणपत शिंदे

 

तक्रारदार यांनी पासपोर्ट मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. हा अर्ज व्हेरीफिकेशन व पत्ता पडताळणी कामी जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे पडताळणी होऊन पुढील कार्यवाही होण्यासाठी प्राप्त झाला होता. तक्रारदार हे पासपोर्टचे अनुषंगाने पाठपुरावा करीत असतांना यातील लोकसेवक शिंदे यांना भेटला.

लोकसेवक असलेला सहायक पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी तक्रारदार यांना पासपोर्टचे अनुषंगाने पत्त्याबाबतची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करण्याकामी १५०० रुपये लाचेची मागणी केली व सदर लाच रक्कम यातील आरोपी क्रमांक दोन खाजगी इसम मुल्ला यांचे मोबाईल क्रमांकाचे फोन पे खात्यावर पाठविण्याबाबत सांगितले व यातील आरोपी क्र.०२ मुल्ला यांनी त्यास संमती दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने यातील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून सविस्तर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, पोलीस अंमलदार- घुगे, घाडगे, जानराव, किणगी, सोनवणे, सण्णके, पकाले, सुरवसे यांनी केली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

● अक्कलकोट रस्त्यावर एसटी कारचा अपघात; एक ठार तीन जखमी

 

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर – तोळणूर रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक राज्यातील कर्नाटक एसटी आणि नवीन इर्टींगा समोरासमोर धडक झाल्याने 1 जण जागीच मृत्यू 3 जण जखमी कारमधील प्रवासी नाशिकचे रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

 

 

अक्कलकोट तोळणूर रस्त्यावर नागणसूर गावाजवळ कर्नाटक विभागाची बस व कारच्या भीषण अपघातामध्ये कारमधील एकजण मयत तर इतर सहाजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी ( २६ जून) रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला.

विनायक घोरसे (वय ४०) असे मयताचे नांव आहे. कर्नाटक बस (क्रमांक के.ए.२८ एफ २२९७ ) ही विजापूर आगाराची बस सोलापूरहून तोळणूरमार्गे विजापूरकडे जात होती. तेव्हा तोळणूरवरून अक्कलकोट कडे येणाऱ्या कार (क्रमांक एम.एच.१४ के बी ५८७७) ही समोरून येणाऱ्या कर्नाटक बसवर आदळून अपघात झाला.

यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील विनायक घोरसे (वय ४०) हा जागेवर मयत झाला तर इतर दीपक क्षिरसागर वय अंदाजे ५४, राघव निकम वय ५१, रमेश कोडतरकर वय ५८, रघुनाथ कोटोळे वय ५४ , सचीन भ्रम्हणकर वय ४० व कन्हैय्यालाल सोनवणे वय ५४ (सर्व रा.नाशिक) गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

या सर्वांना खासगी रूग्णवाहिकेतून सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कारमधील सर्वच गंभीर जखमी झाल्याने रात्री उशिरापर्यंत दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कर्नाटक बस चालक आमसिद्ध सोमलिंग सावकार (वय ४२) हा बस चालवत होता. कारमधील सर्वजण अक्कलकोट येथील नातेवाईकांचे देवकार्य असल्याने नाशिकहुन आले होते. देवकार्य उरकून अक्कलकोटकडे येत असताना हा अपघात झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन जखमींना रूग्णालयात पाठविले.

 

□ शॉर्टसर्किटमुळे ऑटोमोबाइल दुकानाला आग

 

सोलापूर : सांगोला तालुक्‍यातील श्रीराम ऑटोमोबाईल या मोटरसायकलच्या साहित्‍याच्या दुकानाला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्‍याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सांगोला तालुक्यातील मोटरसायकलचे साहित्य मिळण्याचे एकमेव होलसेल दुकान म्हणूनच श्रीराम ऑटोमोबाइल हे दुकान आहे. या श्रीराम ऑटोमोबाइल दुकानाला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता प्राथमिक अंदाज आहे.

या शॉर्टसर्किटमुळे दोन मजली असलेले स्पेअर पार्टचे साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. श्रीराम ऑटोमोबाइल या दुकानाचे मालक नामदेव आदलिंगे असुन, या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

 

 

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #Passport #Verification #Solapur #Corrupt #Police #Tours #Driver #Arrested #crime, #सोलापूर #पासपोर्ट #व्हेरीफीकेशन #लाचखोर #पोलीस #टुर्सचालक #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिंदे गटाला दिलासा, नरहरी झिरवळ न्यायाधीश कसे झाले? सुप्रीम कोर्टाने फटकारले
Next Article सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय आवारात महिलेचा मृतदेह, मुलींनी फोडला हंबरडा

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?