Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Municipal elections महापालिका निवडणूक : ओबीसींची गणना करण्याचे आदेश;  घरोघरी जाऊन जनगणना करण्याचे नियोजन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Municipal elections महापालिका निवडणूक : ओबीसींची गणना करण्याचे आदेश;  घरोघरी जाऊन जनगणना करण्याचे नियोजन

Surajya Digital
Last updated: 2022/06/03 at 1:32 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३८ प्रभागात असलेल्या ओबीसींची गणना करण्यात येणार आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत अशी सर्वच राजकीय पक्षाची भूमिका आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसींची गणना करून येत्या दहा जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. Municipal elections: Order to count OBCs; Planning a door-to-door census

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□  हरकतींसाठी मुदत 6 जूनपर्यंत

राज्य सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ट्रिपल टेस्ट तसेच अन्य प्रक्रिया पूर्ण  करण्यास सुरूवात केली आहे.  त्यानुसार सोलापूर महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी (ता.3) निवडणूक आयोगाच्या निर्देेशानुसार 750 मतदान केंद्र अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये या अधिकार्‍यांना घरोघरी जाऊन ओबीसी मतदारांची माहिती संकलित करण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे. ही सर्व माहिती  10 जूनपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल दाव्यांमध्ये सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सोलापूरसह राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. सोलापूर महापालिकेची निवडणूक 8 मार्चपूर्वी घेणे अपेक्षित होते.  10 मार्च रोजीच सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रक्रिया स्थगित केल्यामुळे इच्छुकांची निराशा झाली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/553750116302722/

 

दरम्यान, 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका होत असल्यामुळे राज्य सरकारने तातडीने ओबीसी समर्पित आयोगाच्या माध्यमांमधून आवश्यक  वातावरणासाठी सुरुवात केली आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका निवडणुकीचे सुरुवातीचे टप्पे पार पडले आहेत. गेल्या मंगळवारी ओबीसी वगळता इतर म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत अशी सर्वच राजकीय पक्षांची मागणी आहे.

 

आयोगाने मध्य प्रदेशच्या अहवालाचा अभ्यास करून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींची असलेली संख्या घरोघरी जाऊन नोंद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे ही गणना करण्यात येत आहे. राज्यात सुमारे ९५ हजार मतदान केंद्रे (बूथ) असून साधारणपणे एक हजार ते बाराशे मतदार एका केंद्रात असतात. प्रत्येक केंद्रप्रमुख किंवा सहायक यापैकी शासकीय कर्मचाऱ्यांना एकूण लोकसंख्या व ओबीसी सर्वेक्षणाचे काम देण्यात येणार आहे.

 

□  हरकतींसाठी मुदत 6 जूनपर्यंत

मंगळवारी  113 जागांसाठी राखीव व सर्वसाधारण गटाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण झाली. या आरक्षण सोडतीवर 6 जूनपर्यंत हरकत घेण्याची मुदत आहे. दोन दिवसात कोणाचीही आरक्षण सोडतीवर हरकत आली नाही.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/553596349651432/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #solapur #Municipal #elections #Order #count #OBC #Planning #door-to-door #census, #महापालिका #निवडणूक #ओबीसी #गणना #आदेश #घरोघरी #जनगणना #सोलापूर #नियोजन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात पिता पुत्राने केली बँकेची ९२ लाखाची फसवणूक; लग्नासाठी बापाच्या डोक्यात घातली कळशी
Next Article मविआचा प्रस्ताव भाजपने धुडकावला; राज्यसभा निवडणूक होणारच!

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?