Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पैशाच्या कारणावरून बहिणीचा खून; सख्खी बहीण आणि तिच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पैशाच्या कारणावरून बहिणीचा खून; सख्खी बहीण आणि तिच्या मुलीला जन्मठेपेची शिक्षा

Surajya Digital
Last updated: 2023/02/23 at 1:44 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● उपरी येथील विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

सोलापूर – आर्थिक व्यवहार आणि अनैतिक संबंधाच्या कारणावरून सख्या बहिणीचा चाकूने खून केल्याच्या आरोपावरून मयताची सख्खी बहिण आणि तिची विवाहित मुलगी या दोघांना जन्मठेप अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.एच.पाटवदकर यांनी बुधवारी ठोठावली. Murder of sister over money; Court sentences Sakkhi’s sister and her daughter to life imprisonment

साखराबाई शिवाजी मल्लाव (वय ५०) आणि तिची विवाहीत मुलगी अनिता विजय भुई (वय ३५ दोघी रा. तिरहे_ ता.उत्तर सोलापूर) अशी शिक्षा झालेल्या मायलेकींची नावे आहेत.या दोघींनी मिळून हौसाबाई मल्लाव (वय ५५) यांचा खून केला होता.

या खटल्याची हकीकत अशी हौसाबाई मल्लाव या ति-हे येथे आपल्या मुलासोबत राहण्यास होत्या. कांही अंतरावर त्यांची बहीण साखराबाई मल्लाव आणि तिची मुलगी अनिता भुई या दोघी राहण्यास होत्या. बहिणीचे अनैतिक संबंध आणि पैशाच्या देण्याघेण्यावरून सख्या बहिणीत वाद होता.

घटनेच्या दिवशी म्हणजेच १२ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास हौसाबाई मल्लाव या घरात काम करीत होत्या. त्यावेळी साखराबाई मल्लाव आणि तिची मुलगी अनिता या दोघी त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. त्यानंतर साखरबाई हिने त्यांच्यावर चाकूने हल्ला केली होती.या मारहाणीत हौसाबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्या उत्तरादरम्यान मयत झाल्या.
दरम्यान त्यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जवाबावरून सोलापूर तालुक्याच्या पोलिसांनी मायलेकी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती.

 

या खटल्यात सरकारतर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले होते. न्यायालयात साक्षीच्यावेळी साक्षीदाराने फुटले होते. मयताचा मृत्यूपूर्व जबाब आणि सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघींना जन्मठेप आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे अॅड.दत्तूसिंग पवार तर आरोपीतर्फे अॅड. व्हि.डी फताटे यांनी काम पाहिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● उपरी येथील विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

पंढरपूर: – माहेरहून दोन तोळे सोने आणावे यासाठी पतीसह तिघांनी शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे तालुक्यातील उपरी येथील विवाहितेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

 

या घटनेमध्ये शितल नवनाथ नागणे हिचा मृत्यू झाला असून याप्रकरणी तिचा नवरा नवनाथ नागणे, सासरे देविदास व सासू भागीरथी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी मयत शितल नागणे यांचा भाऊ गणेश प्रल्हाद आसबे रा.खरसोळी याने गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणेश आसबे याचा 27 जुलै 2022 रोजी विवाह झाला होता. यावेळी आसबे कुटुंबीयांनी नवनाथ नागणे यांचा जावई म्हणून मानपान केला होता. मात्र नवनाथ याने दोन तोळे सोन्याचा आहेर पाहिजे म्हणून हट्ट धरला.

आसबे यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दोन तोळे सोने देऊ शकले नाहीत. यामुळे संतापलेल्या नवनाथने तेव्हापासून शितलला वारंवार शिवीगाळ करणे मारहाण करणे असे प्रकार सुरू केले होते. तसेच शितल चे सासरे देविदास नागणे व सासू भागीरथी नागणे हे देखील वारंवार तिला जाचहाट करीत होते. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळूनच रविवार 19 रोजी सकाळी शितल हिने आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Murder #sister #overmoney #Court #sentences #Sakkhi's #sister #daughter #imprisonment, #सोलापूर #पैसा #कारणावरून #बहिणी #खून #सख्खीबहीण #मुलीला #जन्मठेप #शिक्षा #न्यायालयीन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोहोळमध्ये येऊन मुख्यमंत्री सावंतांची राजन पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर
Next Article इंद्रभुवन , कौन्सिल हॉलसह महापालिकेच्या पाच इमारतींच्या साफसफाईचा मक्ता देणार !

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?