Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चला ! डेंग्यूवर जागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

चला ! डेंग्यूवर जागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करा

admin
Last updated: 2025/06/16 at 4:22 PM
admin
Share
13 Min Read
SHARE

डेंग्यूविषयी नागरिकांमध्ये जागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी जनतेचा सक्रिय सहभाग करून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत माहिती दिली जाते. डेंग्यू आजारावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व ईतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी,आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशाताई हे काम करत आहेत व किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवत आहेत. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी ८ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.

सध्या नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते. त्या अनुषंगाने साठविलेल्या पाण्यात एडिस इजिप्टाय डास अंडी घालतात. त्यातून डासोत्पत्ती होते. डेंग्यू हा अत्यंत गंभीर आजारांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त आहेत.तर काही लोकांसाठी हा आजार जीवघेणाही ठरतो. विशेषतः पावसाच्या सुरुवातीच्या काळात डेंग्यूचे रुग्ण सर्वाधिक आढळतात. अशा परिस्थितीत लोकांनी डेंग्यू या आजाराबाबत जागरुकता बाळगली पाहिजे.

डेंग्यूची कारणे … डेंग्यू हा डासांपासून पसरणारा रोग आहे.साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या वाढतात. डेंग्यूचा डास चावल्याने डेंग्यू होतो. जुलै ते ऑक्टोबर हे महिने डेंग्यूच्या अळ्यांच्या प्रजननासाठी अनुकूल असतात. या काळात पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता अधिक असते. अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात. डेंग्यूमध्ये अनेक प्रकारची सुरुवातीची लक्षणे दिसू शकतात. डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवून राहिलेल्या पाण्यात होते. स्वच्छ पाण्यात या डासाची उत्पत्ती होते. डबके, करवंट्या, छत अथवा अंगणातील भंगार साहित्यात पावसाचे पाणी साचल्याने हे डास वाढतात, तसेच पाणीसाठे घट्ट झाकून न ठेवल्याने हौदातही एडिस एजिप्टाय डासांची उत्पत्ती होते.

डेंग्यूची लक्षणे काय ..?

एडीस एजिप्टाय डासाच्या संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच-सहा दिवसानंतर डेंग्युची लागण होते. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) अशा दोन प्रकारे हा आजार फैलावतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. याखेरीज एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे,चव आणि भूक नष्ट होणे, मळमळणे आणि उलट्या होतात. डेंगी ताप आजारात रुग्णास २ ते ७ दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दुःखीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्तपणा,भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते तीव्र स्वरूपाचा ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी,उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, जुलाब रक्तमिश्रित होणे, अशी लक्षणे आहेत. ज्या व्यक्तीस डेंग्यू आजाराची लागण झाली आहे. अशामध्ये तापात चढउतार होणे,थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, मळमळणे अशी डेंग्यूची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार काय काळजी घ्याल ..?

डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरून घेवून झोपावे. सायंकाळी ६ ते ८ दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स,कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी.शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑईल टाकावे.

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत व कोरडा दिवस पाळावा. या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगणात व परिसरातील खड्डे बुजवावेत,त्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत व कोरडा दिवस पाळावा. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात. वरील सर्व उपाययोजनांचा अवलंब केल्यास डासामार्फत प्रसार होणारे हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, चिकनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर या आजारापासून आपण मुक्त होऊन व आपल्या भावी पिढ्यांना आरोग्यदायी जीवनाचा अमूल्य ठेवा देऊ. तसेच वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

वरील दक्षता प्रत्येकाने घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दुर ठेवील. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा ताप असेपर्यंत आराम करावा.ताप कमी होण्यासाठी ‘पेरासिटेमोल’ गोळ्या घ्या. ताप अथवा वेदनाशामक म्हणून अस्पिरीन अथवा आयबुप्रोफेन गोळ्या घेऊ नयेत. निर्जलिकरण होऊ नये म्हणून जलपेयांचा भरपूर उपयोग करावा. (उदा. क्षार संजिवनी) रक्तस्त्राव किंवा शोकची लक्षणे असल्यास रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात भरती करावे. अंग पूर्णपणे झाकणारे कपडे घालावेत मच्छरदाणी किंवा क्रीमचा वापर करावा. साठवलेले किंवा साचलेले पाणी बदलावे तसेच तुंबलेल्या गटारी वाहती करावीत तसेच खाली न करता येणाऱ्या पाणी साठ्यात, उदा.टाकी हौद यामध्ये गप्पी मासे सोडावेत. आपल्या घरी डेंग्यू ताप सर्वेक्षणसाठी येणार्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करा व आपण अथवा इतर कोणीही आजारी असल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

निदान कसे कराल …?

डेंग्यूची लक्षणे दिसताच त्याकडे दुर्लक्ष करू नये अथवा अंगावर काढू नये. तात्काळ नजीकच्या सरकारी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आवश्यकतेनुसार रक्तजल नमुने घेऊन चाचणी केली जाते.डेंग्यूची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. भरपूर पाणी प्यावे. पुरेशी विश्रांती घ्यावी. डेंग्यूमुळे प्लेटलेट संख्या कमी होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे तज्ज्ञांकडून वारंवार चाचणी करून घ्यावी.

पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यात किती रुग्ण …

डेंग्यूची लक्षणे दिसून आल्याने गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यातील ३०८ जणांचे रक्तजल नमुने घेऊन तपासण्यात आले. त्यात ९ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले व १५ जणांना चिकन गुणियाची लागण झाल्याचे आढळले. त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. डेंग्यू आजाराची लक्षणे दिसून येताच तात्काळ उपचार घ्यावेत. त्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढून वेदना अधिक जाणवतात.

डेंग्यूवर होतो उपचार -डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी उपाय केले जातात. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत औषधोपचाराची सुविधा आहे. पावसाळा आला की वातावरणात गारवा आणि वाढते. पण त्यासोबतच हवेतील आर्द्रता, साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे साथरोगांचा धोका देखील वाढतो. विशेषतः या दिवसांत लहान मुले आणि वयोवृध्द नागरिक अधिक आजारी पडतात. त्यामुळे वृध्दांसह बालकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. साथरोग पावसाळ्याच्या दिवसात विशेषतः सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, जुलाब-उलट्या यासारखे आजार सामान्यतः पाण्यातून, हवेतून किंवा दूषित अन्नातून होतात. त्यामुळे स्वच्छता बाळगणे,उकळून थंड केलेले शुद्ध पाणीच मुलांना पिण्यासाठी देणे गरजेचे असते. एकूणच पावसाळ्यात लहान मुलांना साथरोगांपासून दूर ठेवण्यासाठी योग्य स्वच्छता, संतुलित आहार,पुरेसा आराम आणि योग्य वेळी वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांना पावसाळ्यात होणारे आजार टाळता येतील, असे बालरोग तज्ज्ञ सांगतात.

काळजी कशी घ्याल – स्वच्छता :

मुलांना नियमितपणे साबणाने हात धुण्यास सांगावे, विशेषतः जेवणापूर्वी आणि खेळणे झाल्यानंतर.त्यांच्या नखांची स्वच्छता ठेवावी.

संतुलित आहार :

मुलांना पौष्टिक आणि संतुलित आहार द्यावा,ज्यामुळे त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढेल. भरपूर पाणी प्यायला सांगा. बाहेरचे खाणे टाळा.

लसीकरण करावे :

लसीकरण पूर्ण असल्यास गंभीर आजारांपासून मुलांचे संरक्षण होते. त्यामुळे विशिष्ट वयात आवश्यक ते लसीकरण पूर्ण करावे.

भिजल्यानंतर कपडे बदलणे :

पावसात भिजल्यास लगेचच ओले कपडे बदलणे, यासोबतच केस सुकवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात साथरोगांचा धोका पावसाळा हा साथरोगाच्या दृष्टीने अधिक पोषक आहे. गढूळ पाणी, अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे पावसाळ्यात साथीचे आजार वाढतात. त्यामुळे या दिवसात बालकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया आणि दूषित पाण्यामुळे होणारे आजार जास्त वाढतात. यासाठी घरासह परिसराची स्वच्छता राखणे, डासोत्पत्ती होऊ नये,यासाठी कोरडा दिवस पाळणे, अशा उपाययोजना कराव्यात.

बालकांमध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी अशा आजरांबाबत कुठलीही लक्षणे आढळल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत. परिसर स्वच्छ ठेवा घराभोवताली साचलेले आणि प्रदूषित पाणी काढून टाकावे. आठवडचातून एक दिवस ‘कोरडा दिवस पाळावा. यामुळे पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू ताप आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांपासून संरक्षण होते.

प्रत्येक वर्षी १६ मे रोजी “राष्ट्रीय डेंग्यू दिवस” साजरा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे डेंग्यूविषयी जनजागृती करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे.

घोषवाक्य (२०२५) :

“तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा, डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा” डेंग्यूचा प्रसार “एडिस इजिप्टाय” नावाच्या डासामुळे होतो.

डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतात (८ दिवसांपेक्षा जास्त साठवलेले पाणी). तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, अंगदुखी, पुरळ, मळमळ, उलट्या.

डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (DHF) गंभीर असतो व मृत्युही होऊ शकतो. • प्लेटलेट्स कमी होतात.

तपासणी व उपचार मोफत (प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात). • लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.• पेरासिटेमोलचा वापर करावा : aspirin वा ibuprofen टाळावेत. • भरपूर पाणी प्यावे.

प्रतिबंधात्मक उपाय : • आठवड्यातून एकदा सर्व पाणीसाठे रिकामे करावेत व “कोरडा दिवस” पाळावा. पाणीसाठे झाकून ठेवावेत. अंगभर कपडे, मच्छरदाणी, मच्छररोधी औषधे वापरावीत. घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.गप्पी मासे पाण्याच्या टाकीत सोडावेत (डास अळी खातात).

पावसाळ्यातील धोका :

पावसात साचलेले पाणी, आर्द्रता, अस्वच्छता यामुळे साथरोग (डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड) वाढतात. • लहान मुले व ज्येष्ठ नागरिक अधिक संवेदनशील असतात. • स्वच्छता, संतुलित आहार, लसीकरण व वेळेवर वैद्यकीय मदत आवश्यक.

निष्कर्ष : डेंग्यू हा टाळता येण्याजोगा आजार आहे. त्यासाठी जनजागृती, स्वच्छता, वेळेवर निदान व उपचार आणि सरकारी उपाययोजनांमध्ये लोकांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात लहान मुलांची साथरोगांपासून काळजी पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, जुलाब व उलट्या यांसारखे साथरोग होण्याचा धोका वाढतो.हे रोग प्रामुख्याने दूषित पाणी, हवेतून वा अस्वच्छ अन्नामुळे होतात. बालकांचे आरोग्य टिकवण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत : काळजी घेण्याचे उपाय : • स्वच्छता : मुलांनी साबणाने हात धुणे,नखांची स्वच्छता ठेवणे. • संतुलित आहार : पौष्टिक आहार व शुद्ध पाणी,बाहेरचे अन्न टाळणे. • लसीकरण : आवश्यक लसी वेळेवर देणे. भिजल्यानंतर कपडे बदलणे : ओले कपडे बदलून केस सुकवणे. साथरोगांचा धोका आणि प्रतिबंध : पावसाळा साथरोगांसाठी अनुकूल काळ आहे. डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छता यामुळे डेंग्यू,मलेरिया, चिकुनगुनिया वाढतात.प्रतिबंधक उपाय: घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे.साचलेले पाणी काढून टाकणे. •आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळणे. • लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे पावसाळ्यात योग्य काळजी, स्वच्छता, आहार आणि लसीकरणामुळे मुलांना साथरोगांपासून सुरक्षित ठेवता येते.

संकलनजिल्हा माहिती कार्यालयधाराशिव.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी
Next Article लखनऊ विमानतळावर मोठा अपघात टळला

Latest News

Как заинтересованность трансформируется в страсть
Top News December 8, 2025
four. And that Most other Web based casinos Are similar to Horseshoe Casino?
Top News December 8, 2025
Take pleasure in prize-winning casino games by this finest vendor and you may feel harbors off the highest quality
Top News December 8, 2025
A casino’s interface normally rather impression the to tackle experience
Top News December 8, 2025
To have bets which have near to a great consequences you victory about half the amount of time and you may cure additional half the full time
Top News December 8, 2025
Manage I need to Down load The new Hollywood Local casino Pennsylvania App?
Top News December 8, 2025
Of many online gambling fans be aware that an educated web based casinos provide multiple incentives
Top News December 8, 2025
$fifty No-deposit Gambling establishment Added bonus to start your own Playing Feel!
Top News December 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?