Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हराळवाडीत बिबट्या सदृश्य प्राण्याने पाडला श्वानाचा पडशा, भीतीचे वातावरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

हराळवाडीत बिबट्या सदृश्य प्राण्याने पाडला श्वानाचा पडशा, भीतीचे वातावरण

Surajya Digital
Last updated: 2021/10/07 at 5:14 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

विरवडे बु : हराळवाडी (ता. मोहोळ )येथे मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री हरी धोडमिसे या शेतकऱ्यांच्या शेताजवळील गायरानात बिबट्या सदृश्य प्राण्याने श्वानावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. वनविभागाचे अधिकारी थोरात यांनी परिस्थितीची पाहणी करून ठसे घेऊन ठसे पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्या सदृश या प्राण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हराळवाडी शिवारात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने याच परिसरात बिबट्या लपून बसला असेल म्हणून कोणीही शेतकरी शेताकडे जाण्यास तयार नाही.

वन विभागाकडे बिबट्याचा वावर असलेल्या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जीवाची जोखीम घेऊन शेतामध्ये जाण्याची वेळ येऊ देण्याऐवजी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना आपली सुरक्षा करण्याचे तसेच जनावरांची सुरक्षा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपली जनावरे चारण्यासाठी मोकळी सोडू नये, गोठ्यामध्ये बांधण्याचे तसेच शेतात जाताना किंवा येताना एकटे न जाता समूहाने जाणे तसेच आवाज करत जाणे किंवा मोबाईलवर गाणे लावून जाणे तसेच बिबट्या दिसला तर त्याचा फोटो काढण्यासाठी त्याच्या पाठीमागे जाऊ नये, शेतांत राहणा-यांनी आपल्या घराबाहेरील लाईट चालू ठेवावे, अशा सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रथमदर्शनी हे ठसे बिबट्या सदृश्य प्राण्याचे असून ठसे घेऊन तपासणीसाठी पुढे पाठवले आहेत. तपासाअंती आपल्याला समजेल, निश्चित कोणाचे ठसे आहेत. तरी सध्या शेतकऱ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे थोरात (वनविभागाचे अधिकारी) यांनी सांगितले आहे.

  * पूर्ववैमनस्यातून उचलून आपटून पाय मोडला

बार्शी : पूर्ववैमनस्यातून एकास उचलून आपटून त्याचा पाय मोडल्याची घटना कारी येथे घडली आहे. याबाबत जखमीची आई शैला सुनिल कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रत्नदीप रामचंद्र कदम याच्याविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीचा मुलगा हर्षद हा सकाळी 11 वाजणेच्या सुमारास  गावातील समाज मंदिरासमोर असलेल्या कट्टयावर बसलेला होता. त्यावेळी रत्नदिप कदम हा दारु पिवून तिथे आला. त्याने मागील भांडणाचा राग मनात धरुन हर्षद यास उचलून आपटले व मारहाण केली. त्यामुळे त्याचा पाय फ्रक्चर झाला. यावेळी त्यांना कळल्यानंतर त्या घटनास्थळी गेल्या असता रत्नदीप याने त्यांनाही मारहाण करत तुम्हांला सोडणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Haralwadi #leopard-like #animal #knocked #dog #atmosphere #fear, #हराळवाडी #बिबट्या #सदृश्य #श्वानाचा #पडशा #भीती #वातावरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते स्वामींच्या मंदिराचे द्वार उघडले, दर्शन सुरू
Next Article उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकरचे छापे, पवारांचा संताप

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?