Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगोल्यात क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरणात वाद; बेदम मारहाणीत झाला मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सांगोल्यात क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरणात वाद; बेदम मारहाणीत झाला मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/12/09 at 9:39 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – गावातील क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी प्रमोद उंबरे यास कोण भाई, कुठला भाई, तो मुंबईत राहतो आमच्या गावात त्याचे काय काम! असे म्हणत आरडाओरड केल्याचा राग धरून एका 55 वर्षीय इसमास मोटारीतून पळवून नेऊन बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

ही घटना शुक्रवारी (दि.३ डिसेंबर) रोजी रात्रीच्या सुमारास उदनवाडी (ता. सांगोला )येथे घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलीसांनी चौघां विरुद्ध अपहरण आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. त्यांना ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सांगोल्याच्या न्यायालयाने दिला आहे .

शिवाजी तुकाराम मोटे (वय ५५रा. उदनवाडी ता.सांगोला) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रमोद ठोंबरे, गणेश सोपान कांबळे, दादा उर्फ विकास चौगुले (सर्व रा. कारंडेवाडी) आणि आसिफ लियाकत काजी (रा.नाझरे ता.सांगोला) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उदनवाडी ( ता. सांगोला) येथील मारुती मंदिराजवळ सायंकाळच्या सुमारास गावात झालेल्या क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरणाच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी   शिवाजी मोटे याने प्रमोद ठोंबरे याला तू मुंबईचा आहे, आमच्या गावात तुझे काय काम आहे, असे म्हणत आरडाओरड  करत होता. कार्यक्रम संपल्यानंतर गावातील चौकात प्रमोद ठोंबरे याच्यासह चौघांनी त्याला पकडून प्लास्टिक पाईप आणि वायरने बेदम मारहाण करीत मोटारीतून कोरडवाडी येथील नदीकडे पळवून नेले.

त्याला पुन्हा मारहाण करून रात्री १० वाजेच्या सुमारास गावात आणून सोडले होते. त्यानंतर शिवाजी मोटे हा घरात जाऊन झोपला होता. त्यानंतर तो सकाळी मृतावस्थेत आढळून आला. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर मयताचे शवविच्छेदनानंतर करण्यात आले. तेव्हा त्याचा अंगावर मारहाणीचे  व्रण दिसून आले. शिवाय त्याचा मृत्यू मारहाणीत झाला, असा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.

शिवाय कार्यक्रमाच्या वेळी हा प्रकार घडत असताना  मयताच्याच्या साथीदाराने चौघांना पाहिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान फौजदार संदीप  नाळे यांनी नुकतीच चौघांविरुद्ध सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. आरोपींपैकी प्रमोद ठोंबरे (रा. कारंडेवाडी) हा मात्र घटनेनंतर फरार झाला. पुढील तपास सहायक निरीक्षक यमगर हे करीत आहेत.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #Dispute #prize #distribution #cricketmatch #Sangola #beaten #death, #सांगोला #क्रिकेट #सामना #बक्षीस #वितरण #वाद #बेदम #मारहाण #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यातील पहिला ओमिक्रॉनबाधित रुग्ण कोरोनामुक्त; ओमिक्रॉनचे एकूण दहा रुग्ण
Next Article मद्यधुंद चालकामुळे कार बीआरटीच्या बसथांब्याला धडकली; दोन ठार

Latest News

नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?