Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अल्पवयीन मुलीचा विवाह; बारा आठवड्याची मुलगी गरोदर; मुलीच्या वडिलांसह पती, सासर्‍यावर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

अल्पवयीन मुलीचा विवाह; बारा आठवड्याची मुलगी गरोदर; मुलीच्या वडिलांसह पती, सासर्‍यावर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/12/11 at 10:06 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

सोलापूर : शहरातील एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याबद्दल तिचे वडिल,पती व सासरे यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Marriage of a minor girl; Twelve weeks pregnant with a baby girl; Crime against girl’s father along with husband, father-in-law

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन निर्भया हिचे लग्न मे २२ मध्ये झाले. तसेच त्याच लग्नात निर्भयाच्या मोठ्या बहिणीचे लग्न तिच्या नवऱ्याच्या भावाबरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर निर्भया ही सासरी नांदण्यास आल्यानंतर तिचे पती बरोबर शरीर संबंध झाले. त्यानंतर पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात ऍडमिट केले असता ती १२ आठवड्याची गरोदर असल्याचे निदर्शनास आले.

 

यावेळी डॉक्टरांनी त्या मुलीचे आधार कार्ड मागितले असता ते वेळेत दिले नाही. संशय आल्यानंतर हॉस्पिटलने वारंवार मागणी केली. त्यानंतर ती मुलगी १७ वर्ष ७ महिने वयाचे असल्याचे निदर्शनास आले. मुलगी अल्पवयीन असताना सुद्धा तिचे लग्न लावून दिल्याबद्दल त्या निर्भयाच्या वडिलावर, सासऱ्यावर तसेच मुलगी अल्पवयीन असताना देखील तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवल्याबद्दल पतीविरोधात बाल लैंगिक कायद्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

● कोंडी येथील अपघातातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

सोलापूर – कोंडी शिवारात अपघात होऊन जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान आज रविवारी सकाळी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला .

विलास रेवणसिद्ध ऐवळे (वय ४५ रा. देशमुख वस्ती , उत्तर सोलापूर ) असे मयताचे नाव असून ते शनिवारी रात्री आपल्या मोटर सायकल वरून राहुरी कडून घरा कडे येत होते. कोंडी येथील ब्रह्मदेव माने बँकेसमोर गाडी स्लीप होऊन डिव्हायडरला आदळली. यात मार लागून गंभीर जखमी झाले हाते. शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.

 

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● विडी घरकुल परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – घरात कुणी नसताना एका २६ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विडी घरकुल (ई ग्रुप) येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली.
स्नेहा गणेश कॅरमकोंडा (वय २६ रा.विडी घरकुल) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह किचन मधील छताच्या लोखंडी हुकास साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत स्नेहा हिच्या पश्चात पती एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तिचा पती डेकोरेशनचे काम करत असुन तो हैदराबाद येथे गेला आहे. तर तिची दोन्ही मुले आजोबाच्या घरी गेले होते. ती घरात एकटीच असताना तिने हा प्रकार केला. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
● पंढरपूर अपघात; जखमी इसमाचा मृत्यू
पंढरपूर येथील गाडगे बाबा चौकाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेने गंभीर जखमी झालेले विठ्ठल लक्ष्मण चौगुले (वय ३४ रा. पंढरपूर) हे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना आज रविवारी पहाटे मरण पावले. हा अपघात २९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडला होता. त्यांना पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते.

 

 

You Might Also Like

26/11 च्या वेळी केलेली मागणी आता भारताची अधिकृत भूमिका : फडणवीस

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

दगडूशेठ गणपतीसमोर ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन

चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

TAGGED: #Marriage #minorgirl #Twelve #weeks #pregnant #babygirl #Crimeagainst #girl'sfather #husband #father-in-law, #सोलापूर #अल्पवयीन #मुली #विवाह #बारा #आठवड्या #मुलगी #गरोदर #वडिल #पती #सासरे #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्र्यांनी सोलापुरात गुरव समाजासाठी केली मोठी योजना जाहीर
Next Article सोलापुरात गाडीचा ताफा अडवून मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?