Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बैलगाडी उलटल्याने शेतकरी जखमी; वैरागवाडीत ७ जणांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बैलगाडी उलटल्याने शेतकरी जखमी; वैरागवाडीत ७ जणांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2021/12/11 at 10:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : दहिटणे (ता.अक्कलकोट) येथे वेगाने जाणारी बैलगाडी उलटल्याने अप्पाराव विश्वंभर भोसले (वय ५८) हे जखमी झाले. ही घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास दहिटणे येथे घडली.

अप्पाराव भोसले हे आपल्या शेतातील उसाचा वाडा बैलगाडीत भरून घराकडे निघाले होते. घराच्या काही अंतरावर बैलगाडी उलटल्याने ते जखमी झाले. त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

* वैरागवाडी येथे कोयता, लोखंडी गज आणि खोऱ्याने हल्ला; महिलेसह चौघे जखमी; ७ जणांवर खुनी हल्याचा गुन्हा

सोलापूर – वैरागवाडी (ता. मोहोळ) येथे भावकीतील शेत जमिनीच्या वादातून कोयता, लोखंडी गज, काठी आणि खोऱ्याने केलेल्या मारहाणीत एका महिलेसह चौघे जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणात मोहोळच्या पोलिसांनी ७ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जखमीमध्ये प्रकाश जालिंदर बाबर (वय ६०) प्रमिला सुरेश बाबर, अशोक सुरेश बाबर आणि संजय प्रकाश बाबर ( सर्व रा. बैरागवाडी) यांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी अनिल पोपट बाबर, नितीन बाबर, सतीश बाबर, राजाराम बाबर, ज्ञानेश्वर बाबर, विलास बाबर आणि सुनील बाबर अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गुरुवारी दुपारच्या सुमारास जखमी प्रकाश बाबर हे आपल्या नातेवाईकांसोबत शेतात बोरे वेचत होते. त्यावेळी अनिल बाबर याने आमच्या शेतातून बैलगाडी  नेऊ नका,पिकाचे नुकसान होते. असे म्हणत सर्वांना बोलावून घेतले. आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. अशी नोंद पोलिसात झाली . फौजदार राठोड पुढील तपास करीत आहेत.

* पंढरपूर येथे शिक्षकाचे घर फोडले रोख रकमेसह लाखाचे दागिने लंपास

सोलापूर  – कॉलेजच्या पाठीमागील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अनिल मारुती जगताप या शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील २५ ग्राम सोन्याचे दागिने, ७ हजाराची रोकड, चांदीचे साहित्य आणि अंगणात ठेवलेली मोटर सायकल असा एकूण १ लाख ८ हजाराचा ऐवज पळविला. ही चोरी काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलिसात झाली. हवालदार ढेरे पुढील तपास करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* मुस्तीत मुख्याध्यापकांकडून मारहाण

सोलापूर :  मुस्ती (ता.दक्षिण सोलापूर) येथे पगार स्लिपवर सही करा असे सांगितल्याच्या कारणावरून काठी आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत विशाल प्रताप पाटील (वय ३८ रा. शेळगी) हे जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात विवेक पाटील (भाऊ) यांनी दाखल केले. त्यांना मुख्याध्यापक अविनाश पाटील आणि गणेश पाटील यांनी मारहाण केली. अशी  प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

* शिंगडगाव येथे काठी दगडाने मारहाण दोघे जखमी

शिंगडगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे काठी दगड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत चंद्रकांत शिवराम पाटील (वय ६४) हे जखमी झाले. त्यांना अमोल पाटील याने मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून मारहाण केली. असे त्यांचे म्हणणे आहे.  तर दुसर्‍या घटनेत अमोल रामकृष्ण पाटील (वय३०) हा जखमी झाला.

त्याला चंद्रकांत पाटील आणि अन्य दोघांनी मारहाण केली. माझ्याकडे कामाला काय येत नाही. म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यासह दोघांनी मारहाण केली असे त्याचे म्हणणे आहे. दोघांनाही वळसंग येथे प्राथमिक उपचार करून गुरुवारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले .

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Farmers #injured #bullock #cart #overturn #Crime #murderous #attack #Vairagwadi, #बैलगाडी #उलटल्याने #शेतकरी #जखमी #वैरागवाडीत #खुनी #हल्ल्या #गुन्हा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरचे महिला व पुरुष उपउपांत्य फेरीत; वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा
Next Article ब्रेकिंग – म्हाडाच्या आजपासूनच्या सर्व परीक्षा रद्द, पुढच्या वर्षी होणार परीक्षा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?