Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हॉटेलमधील मारहाणीत बिहारी कामगाराचा खून; तिघांवर गुन्हा, दोघांना कोठडी एक फरार 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

हॉटेलमधील मारहाणीत बिहारी कामगाराचा खून; तिघांवर गुन्हा, दोघांना कोठडी एक फरार 

Surajya Digital
Last updated: 2023/07/10 at 7:19 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर एकजण फरार

सोलापूर : सोलापुरातील जुना कुंभारी नाका परिसरात तिघांनी एकाला केलेल्या जबर मारहाणीत एका मजुरांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसीतील अरिहंत टेक्स्टाईलमध्ये काम करणाऱ्या मुनाकुमार रामधार सिंह (रा. बिहार ) असे त्या मजुराचे नाव आहे. Bihari worker killed in hotel beating; Crime against three, two in custody and one absconding Solapur court मद्यपानावेळी एकमेकांकडे पाहण्यावरून त्यांच्यात मारहाण झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

एमआयडीसी मधील अरिहंत टेक्सटाईल मध्ये काम करणाऱ्या मुनाकुमार राजाराम सिंह (वय-४४,रा.मु.पो.पोगर,तालुका रतिगंज,बिहार) याचा खून केल्याप्रकरणी तीन संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी दोघांना अटक केली तर एक जण फरार आहे. त्यापैकी दोघास न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरिहंत टेक्स्टाईल इंडिस्ट्रीजमध्ये मुनाकुमार राजाराम सिंह हा कामाला असून,जवळच असलेल्या लोकमंगल हॉस्पिटलजवळ तो राहायला होता. घटनेच्या दिवशी बुधवारी (ता. ५ जुलै ) तो जुना कुंभारी नाका परिसरातील हॉटेल बी प्रकाश मध्ये जेवणाकरिता गेला होता. तेथील असलेल्या तीन अनोळखी इसमाकडे बघण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. सिंह याला तिघांनी लाथा बुक्क्यांनी व काचेची बाटली तसेच काठीने मारहाण केली. या गंभीर मारहाणी तो बेशुद्ध होऊन दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. हि घटना ५ जुलै रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बी प्रकाश बार सोलापूर येथे घडली.

या मयताचे येथे कोणीच नातेवाईक नसल्याने अरिहंत टेक्स्टाईलच्या मॅनेजर विलास नारायण बोल्ली (वय-४८,साईबाबा चौक, न्यु पाच्छा पेठ, सध्या- आरफात नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी नित्यानंद परमेला (वय-२९,रा.सोलापूर) व सागर महेश पवार (वय-२३,रा.सोलापूर) या दोघांना अटक केली असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी दिगंबर विटकर (रा. सोलापूर) हा फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बोंदर हे करीत आहेत.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Bihari #worker #killed #hotel #beating #Crime #three #two #custody #one #absconding #Solapur #court, #हॉटेल #मारहाण #बिहारी #कामगार #खून #तिघांवर #गुन्हा #दोघांना #कोठडी #एक #फरार #सोलापूर #न्यायालय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हैद्राबाद रोडवर एसटीच्या धडकेने दुचाकीवरील महिलेसह दोघे जखमी
Next Article राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?