Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: क्रोएशियाच्या पंतप्रधानांकडून मोदींना संस्कृत व्याकरण पुस्तक भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

क्रोएशियाच्या पंतप्रधानांकडून मोदींना संस्कृत व्याकरण पुस्तक भेट

admin
Last updated: 2025/06/19 at 6:45 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

जाग्रेब, 19 जून (हिं.स.): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या क्रोएशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेंकोविज यांनी संस्कृत व्याकरणाचं पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिलं आहे. या पुस्तकाचं नाव ‘वेजडिन यांचं संस्कृत ग्रामर’ हे पुस्तक भेट दिलं आहे.

क्रोएशियाचे वैज्ञानिक आणि मिशनरी फिलिप वेजडिन यांनी संस्कृतबाबतचं हे पुस्तक १७९० मध्ये पहिल्यांदा लॅटिन भाषेत छापण्यात आलं होतं. फिलिप वेजडिन यांनी १७७४ मध्ये भारत दौरा केला होता. त्यानंतर ते मलबारचे व्हॉईस जनरल झाले. त्यांनी भारतात असताना हे पुस्तक लिहिलं होतं. फिलिप वेजडिन हे युरोपातले पहिले असे संशोधक होते ज्यांनी भारतीय भाषा आणि संस्कृती यांचा गांभीर्याने अभ्यास केला. ही सांस्कृतिक भेटवस्तू भारत आणि क्रोएशिया यांच्यातील दीर्घकालीन सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले जात आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रोएशियाचे नेते सिनिशा ग्रगिका यांनी लिहिलेलं पुस्तकही भेट म्हणून देण्यात आलं आहे. “Croatia and India: Bilateral Navigator for Diplomats and Business” असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकात भारत आणि क्रोएशिया यांच्या संबंधांचं तुलनात्मक वर्णन आणि विश्लेषण करण्यात आलं आहे. बुधवारी(दि.१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशियाची राजधानी जाग्रेब या ठिकाणी पोहचले. क्रोएशियाच्या पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं औपचारिक पद्धतीने स्वागत केलं. तसंच मोदींच्या स्वागतासाठी क्रोएशियात असलेले भारतीय नागरिकही मोठ्या प्रमाणावर आले होते. मोदी, मोदी आणि ‘भारतमाता की जय’ या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही क्रोएशियातल्या काही भारतीयांशी संवाद साधला तसंच त्यांच्या बरोबर वेद पठणही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्रोएशियाला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जाग्रेबमध्ये भारतीय संस्कृतीला खूप सन्मान मिळाला आहे. भारतीय समुदायाने क्रोएशियाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे आणि ते आपल्या मुळांशी कायम जोडलेले राहिले आहेत. त्यांची भेट घेऊन मला खूप आनंद झाला.” त्यांनी पुढे म्हटले की, या भेटीद्वारे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बळकट होतील. यानंतर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान प्लेंकोविच यांची सेंट मार्क्स स्क्वेअरमध्ये भेट झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिनिधी स्तरावर द्विपक्षीय चर्चा झाली.

पंतप्रधान प्लेंकोविच म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा एका खास समयी पार पडतो आहे. या ऐतिहासिक दौऱ्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातले आर्थिक संबंध आणखी बळकट होतील असा विश्वास मला वाटतो. विशेषज्ञांचे मत आहे की या ऐतिहासिक भेटीमुळे भारत आणि क्रोएशियामधील राजकीय आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील. त्याचबरोबर व्यापार, नवोपक्रम, संरक्षण, बंदरे, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती आणि कामगारांची देवाणघेवाण या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढेल.

You Might Also Like

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली

इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर

इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट

पाकिस्तानच्या विनंतीवरून ऑपरेशन सिंदूर तूर्त थांबवले – पंतप्रधान

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बच्चू कडू यांच्या मागण्यांवर धोरणात्मक निर्णय घेणार : भरत गोगावले
Next Article आषाढीवारी 2025 – मानाच्या पालख्या, वारकरी अन् भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?