Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नदीच्या बंधाऱ्यावरून जाताना पाण्यात बुडून शेतक-याचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

नदीच्या बंधाऱ्यावरून जाताना पाण्यात बुडून शेतक-याचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/10/08 at 4:01 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मोहोळ : जनावरांना चारा वैरण पाणी करण्यासाठी भोगावती नदीच्या बंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरून पाण्यात पडून एक शेतकरी बुडून मयत झाल्याची घटना दि ७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) गावच्या हद्दीत घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देगाव वाळूज येथील विनायक कृष्णा आतकरे (वय ५०) हे त्या ठिकाणी कुटुंबासह राहतात. शेतीवर अवलंबून उदरनिर्वाह करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात. गावात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून त्यांच्या शेताला ये जा करण्या करिता रस्ता आहे, गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या पावसाने भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. गेल्या वर्षीही पावसाळ्यात पूर आल्यामुळे पश्चिम दिशेने बंधाऱ्याचा भाग फुटल्याने सर्व शेतकरी हे पलीकडे जाण्यासाठी नदीच्या पात्रातूनच ये जा करत होते.

७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान विनायक आतकरे हे जनावरांना वैरण पाणी करण्यासाठी बंधाऱ्यावरून वाहत असलेल्या पाण्यातून नदीच्या पात्रातून पलीकडे जात असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले, त्यावेळी पाण्यात पडून वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला इतर शेतकऱ्यांनी व गावातील लोकांनी बंधाऱ्याच्या जवळ विनायक आतकरे यांचा मृतदेह वाहून जात असताना बाहेर काढला. याप्रकरणी परमेश्वर नागनाथ आतकरे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यापूर्वीही दोन ते तीन वेळा नदीला पूर आला होता त्यावेळी संबंधित विभागाने तात्पुरत्या उपाययोजना करत मुरूम टाकला होता. तो टाकलेला मुरूम वाहून जातो. त्यामुळे नदीच्या पलीकडील शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होते. आमच्या चुलत्याचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असून यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही आम्हाला दाद मिळत नाही त्यामुळे ही घटना घडल्याचे आप्पासाहेब आतकरे (मयताचे नातेवाईक) यांनी सांगितले.

भोगावती नदीवरील देगाव वाळूज येथील बंधारा मागील वर्षी पडलेला आहे त्याबाबत टेंडर निघालेले होते परंतु काही त्रुटी असल्याने ते टेंडर रखडले होते आता नव्याने टेंडर बनविले असून येत्या पंधरवड्यात त्या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत.

–एम टी जाधवर (कार्यकारी अभियंता)

पाटबंधारे विभाग, सोलापूर

* क्राइम ब्रँचचा साहेब आहे म्हणून पंचवीस हजाराची मागणी करणाऱ्या तोतय्या विरोधात गुन्हा दाखल

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथेआयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला क्राईम ब्रँचचा साहेब आहे म्हणून पंचवीस हजारांची खंडणी मागणाऱ्या तोतया विरोधामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथे मीहीर समर विश्वास (वय ४० वर्ष ) हे आयुर्वेदिक उपचाराची प्रॅक्टिस खंडाळी गावांमध्ये मागील १४ वर्षापासून करत  आहेत. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काळी बँग असलेला इसम त्यांच्या दवाखान्यात जाऊन मी क्राइम ब्रांचचा साहेब आहे, तुमचे लायसन्स दाखवा असे म्हणाला असता विश्वास यांनी त्यांचे कडील आयुर्वेदिक प्रॅक्टिस चे लायसन त्यास दाखवले. हे लायसन चालत नाही मी तुम्हाला अटक करू शकतो, असे म्हणून त्यास पचवीस हजार रुपयाची मागणी केली.

त्यांनी एवढे पैसे माझ्याकडे नाहीत माझ्याकडे फक्त पाच हजार रुपये आहेत असे म्हणून त्यांनी त्यांच्याकडील पाच हजार रुपये त्यांनी त्यास दिले व त्यास बोलत असताना त्या इसमाचा फोटो त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये काढून घेतला होता. त्यानंतर तो बाकीचे पैसे ताबडतोब गोळा करा असे म्हणून दमदाटी करू लागला. अन्यथा अटक करण्याची धमकीही त्यांनी दिली. संबंधित इसमाचा फोटोगावातील काही इसमांना दाखवला असता फोटोतील इसम हा खवणी गावातील खंदारे नावाचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून त्या इसमाच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #farmer #drowned #crossing #river #embankment, #नदीच्या #बंधाऱ्यावरून #पाण्यात #बुडून #शेतक-याचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राष्ट्रवादीचा काँग्रेसला सोलापुरात धक्का; माजी महापौर, माजी शहराध्यक्षाचा राष्ट्रवादीत प्रवेश
Next Article मंदिरात प्रशासनाचे नियम डावलल्याने भाजप नेते तुषार भोसलेंवर गुन्हा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?