Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला हेरगिरीप्रकरणी अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

सीआरपीएफच्या अधिकाऱ्याला हेरगिरीप्रकरणी अटक

admin
Last updated: 2025/05/26 at 5:45 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 26 मे (हिं.स.) : ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात गद्दारांच्या मुसक्या आवळल्या जात असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएप) सहायक उपनिरीक्षकाला अटक केली आहे. मोतीराम जाट असे त्‍याचे नाव आहे. मोतीराम 2023 पासून पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती देत ​​असल्याचे उघड झाले आहे. ‘या कारवाईनंतर ‘सीआरपीएफ’ने त्‍याला सेवेतून बडतर्फ केले आहे.

आरोपी मोती राम जाट हा सीआरपीएफमध्‍ये सहाय्‍यक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. हेरगिरीमध्‍ये तो सक्रिय होता. तो 2023 पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना (पीआयओ) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती शेअर करत होता. याचा मोबदला म्‍हणून त्‍याने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून विविध मार्गांनी पैसा मिळवला होता.

मोती राम जाट याला पटियाला हाऊस कोर्टातील विशेष न्यायालयात हजर करण्‍यात आले. न्‍यायालयाने त्याला 6 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. पाकिस्तानला गोपनीय माहिती देत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर सीआरपीएफने सोमवारी जाट याला सेवेतून बडतर्फ केले.मोती राम जाट याच्‍या हालचाली संशयास्‍पद होत्‍या. यामुळे सीआरपीएफ कर्मचाऱ्यांनी केंद्रीय तपास संस्थांशी समन्वय साधून त्‍याच्‍या सोशल मीडियावरील संदेशाची तपासणी केली. यावेळी त्‍याने नियमांचे उल्‍लंघन केल्‍याचे आढळले, पुढील चौकशीसाठी त्याला राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आले. सीआरपीएफ नियमानुसा त्‍याा 21 मे 2025 पासून सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे सीआरपीएफने सांगितले.

पहलगाममध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर देशभरातील विविध राज्‍यांना सतर्कचे आदेश देण्‍यात आले होते. मागील आठवड्यात, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील पोलिस दलांनी संवेदनशील माहिती लीक करण्यापासून ते बेकायदेशीर मार्गांनी गुप्तचर माहिती गोळा करण्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी नागरिकांशी संबंध ठेवण्यापर्यंतच्या आरोपांवर किमान 14 जणांना अटक केली आहे

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानातील नवा व्हिडीओ समोर
Next Article पुणे नालेसफाई घोटाळा: गाळ काढून पुन्हा नाल्यात टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघड पुणे नालेसफाई घोटाळा: गाळ काढून पुन्हा नाल्यात टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघड

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?