पुणे : करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. मात्र संचारबंदी नाही’ असं जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं. तसेच जिल्ह्यामध्ये करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कडकपणे करण्याच्या सूचना दोन्ही महापालिका आणि ग्रामीण भागाला देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लागू केलेल्या करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र, संचारबंदी नाही’ असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी राज्यातील अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले,‘ जिल्ह्यामध्ये करोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कडकपणे करण्याच्या सूचना दोन्ही महापालिका आणि ग्रामीण भागाला देण्यात आल्या आहेत. मात्र, या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न झाल्यास निर्बंध लागू केले जाणार आहेत’
सध्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. मात्र, जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू नाही’ असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले. मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्ण आढळणाऱ्या परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे; तसेच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येणार आहे’ अशी माहिती जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिली.