Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लावणीसम्राज्ञीला लाजवेल असे बारामतीच्या रिक्षावाल्याचे नृत्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

लावणीसम्राज्ञीला लाजवेल असे बारामतीच्या रिक्षावाल्याचे नृत्य

Surajya Digital
Last updated: 2021/03/07 at 12:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : बारामतीच्या एका रिक्षाचालकाने भररस्त्यात आपल्या मित्रांच्या मागणीवर मराठी लावणीवर ठेका धरत अगदी एखाद्या लावणीसम्राज्ञीला लाजवेल असं नृत्य सादर करून दाखवलं आहे. आपण आतापर्यंत महिलांना आणि मुलींना एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यामध्ये सक्रिय सहभाग घेतलेलं पाहिलं आहे. पण या रिक्षाचालकाने केलेल्या मनमोहून टाकणाऱ्या नृत्याने समाजमाध्यमावर चांगलीच हवा केली आहे. बाबजी कांबळे असे या बारामतीच्या अवलिया रिक्षाचालकाचे नाव आहे.

बारामती शहरात रिक्षा चालवणाऱ्या बाबजी कांबळे यांना नृत्याची आवड आहे आणि ती आवड जोपासण्याचा पुरेपुर प्रयत्न ते करत असतात. एकदिवस सहकारी मित्रांच्या मागणीवरून रिक्षा स्टँडवरच त्यांनी ‘मला जाऊ दया ना घरी ,आता वाजले की बारा’ या मराठी लावणीवर आपला नृत्याविष्कार दाखवला आहे. बारामतीच्या या कलाकाराची ही अदा महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरली आहे. या रिक्षाचालकाने एखाद्या लावणीसम्राज्ञीला लाजवेल अशी दमदार लावणी सादर केली आहे.

कांबळे यांच्याच मित्रांनी या दरम्यान हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि सोशल मिडियावर शेअर केेले. त्यानंतर बघता बघता त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली. तसेच हा व्हिडिओ संपुर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीस पडला.

मुळचे बारामतीला लागुनच असलेल्या गुणवडी गावचे बाबजी कांबळे हे रहिवासी आहेत. तसेच ते गुणवडी गावचे ग्रामपंचायत सदस्यही असल्याचं समजतंंय. सर्वगुणसंपन्न आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून कांबळे यांची ओळख आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यांच्या या लावणी व्हिडिओने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावलं असून आत्तापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातुन लाखो लोकांनी त्यांचा व्हिडिओ पाहुन त्याला पसंती दर्शवली आहे.

* मित्रांच्या फर्माईशीतून कला सादर

खास मित्रांनी केलेल्या फर्माईशीतून कांबळे यांनी त्यांची कला सादर केली. नृत्य सादर करताना मित्रांनीच त्यांचे मोबाईलवर चित्रीकरण केले. आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. बाबजी कांबळे यांच्या या व्हिडिओच्या फेसबुकवरील पोस्टवर लोकप्रिय ‘लयभारी’ या पेजवर लाईक, कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यांचा व्हिडिओ महाराष्ट्रातील पसंतीस उतरत असून या लावणी डान्सवर ‘वाहवा’ कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यांचा व्हिडीओ पाहणाऱ्यांचा संख्या लाखात पोहचली आहे.

* व्हायरल व्हिडीओमधून संदेश

बाबजी कांबळे यांनी नटरंग या मराठी चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा या गाण्यावर केलेल्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फेसबूक आणि इतर सोशल मीडिया वरील ग्रुपमध्ये हा व्हिडीओ शेअर केला जातोय. फेसबूक वापरणाऱ्यांकडून बाबजी यांच्या नृत्याचे कौतुक करण्यात येत असल्याचं दिसते.

कोरोना काळातील संकट आणि मंदी या अशा विविध संकटांनी सामान्य माणसाच्या जीवनात असंख्य अडचणी असताना कष्ट करुन जगणाऱ्या व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीत किती आनंद शोधतात हे बाबजी कांबळे यांच्या व्हायरल व्हिडीओमधून दिसून येते.

You Might Also Like

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू

अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट

प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर

आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी

TAGGED: #dance #rickshaw #puller #Baramati #embarrass #LavaniEmpress, #लावणीसम्राज्ञीला #लाजवेल #बारामतीच्या #रिक्षावाल्याचे #नृत्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्विस बॅडमिंटन ओपन फायनलमध्ये सिंधूचा प्रवेश
Next Article वाळू तस्करी करणा-या पोलीस पाटलावर गुन्हे शाखेची कारवाई

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?