Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी महापौर दत्ता दळवी शिवसेनेत दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

माजी महापौर दत्ता दळवी शिवसेनेत दाखल

admin
Last updated: 2025/04/29 at 2:55 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

आम्ही मुंबई स्वच्छ केली काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली – उपमुख्यमंत्री

मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.)।

महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटीशांनंतर महायुती पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेशाला मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वत:ची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरु केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत उबाठाचे ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आज दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत उबाठा गटाला खिंडार पडले. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अडीच वर्षांपासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार आणि विकास प्रकल्प पुढे नेण्याचे काम आपण करतोय. दिलेला शब्द पाळतो त्यामुळे लाखो कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. विधानसभेत ८० जागा लढून ६० जागा जिंकलो तर उबाठा १०० लढून अवघ्या २० जागा जिंकता आल्या. जनतेने खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोक सोडून का जातात याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर आरोप केले जातात. त्यांना कचरा म्हणता मात्र एक माणूस बरोबर आणि लाखो चूक कसे असू शकतात, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पहलगाममधील हल्ल्याचा आम्ही निषेध केला. पर्यटकांच्या पाठिशी शिवसेना आणि सरकार पूर्ण ताकदीशी आहेत. मात्र या घटनेवर राजकारण कुणी करु नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बाल विवाह केल्यास कठोर कारवाई – सातारा जिल्हाधिकारी
Next Article पाकिस्तानी हॅकर्सचा भारतावर सायबर अटॅक

Latest News

Почему переживание угрозы создает жизнь увлекательнее
Top News December 12, 2025
Отчего ожидание исхода порождает душевное стресс
Top News December 12, 2025
Почему человек имеют тенденцию выявлять закономерности в удаче
Top News December 12, 2025
Зачем человеку нравится играть с шансами
Top News December 12, 2025
Механизм действия механизм вознаграждения в мозговых структурах
Top News December 12, 2025
Механизм действия механизм поощрения в головном мозге
Top News December 12, 2025
Beste online Casinos Liste: Übersicht Top 25 Deutschland
Top News December 11, 2025
Отчего даже крохотный успех создает радость
Top News December 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?