Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बापे रे ! आमदार निवासात मृत्यू; भानगड काय? कुंटंबियांचा ‘हा’ आरोप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बापे रे ! आमदार निवासात मृत्यू; भानगड काय? कुंटंबियांचा ‘हा’ आरोप

admin
Last updated: 2025/04/08 at 6:49 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

खास प्रतिनिधी
मुंबई सोलापूर
आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते असलेले विशाल धोत्रे यांचे चंद्राकांत धोत्रे वडील होते. ते एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. ते आकाशवाणी आमदार निवासात थांबले होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिकेला फोन केले गेले. परंतु रुग्णवाहिका आली नाही.आमदार निवासातून रुग्णवाहिकेला वारंवार फोन, पण अ‍ॅम्बुलन्स न आल्याने व्यक्तीचा मृत्यू आमदार निवासातून फोन केल्यावर रुग्णवाहिका आली नाही

राज्याचा आरोग्य विभागाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्याच्याजवळ असणार्‍या आमदार निवासातही वैद्यकीय सुविधा मिळत नाही. मुंबईसारखा राजधानीच्या ठिकाणावरुन, तेही आमदार निवासातून फोन केल्यावरसुद्धा रुग्णावाहिका आलीच नाही. त्यावेळी व्यक्तीला ह्रदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या. परंतु वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळे आमदार निवासात राहणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
चौकट
अनेक फोन केल्यावर रुग्णावाहिका आली नाही
राज्यात सध्या पुणे येथील दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार गाजत आहे. त्यानंतर आता मंत्रालय शेजारी असणार्‍या आमदार निवासातून फोन गेल्यावरसुद्धा रुग्णवाहिका मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आकाशवाणी येथील आमदार निवासात 408 क्रमांकाची खोली आमदार विजयकुमार देशमुख यांना दिली आहे. त्यांच्या खोलीत सोलापूरमधील चंद्रकांत धोत्रे राहत होते. त्यांना रात्री 12.30 वाजता ह्रदयविकारच्या वेदना सुरु झाल्या. त्यामुळे रुग्णावाहिकेला वारंवार फोन करण्यात आले. त्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. शेवटी पोलिसांना फोन करावा लागला. पोलिसांच्या गाडीतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृत धोत्रे हे आमदार देशमुख यांचे कार्यकर्ते
आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते असलेले विशाल धोत्रे यांचे चंद्राकांत धोत्रे वडील होते. ते एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. ते आकाशवाणी आमदार निवासात थांबले होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिकेला फोन केले गेले. परंतु रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
चौकट
आरोग्य व्यवस्थेची लक्तरे पुन्हा वेशीवर
राज्यात मुंबईसारख्या ठिकाणी रुग्णावाहिका वेळेवर येत नाही. मग ग्रामीण भागात काय परिस्थिती असणार? असा प्रश्‍न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या प्रकरणी धोत्रे कुटुंबियाकडून कोणतीही तक्रार दिली नाही. त्यांचा मृतदेह घेऊन कुटुंबीय गावी निघाले आहेत. या प्रकारानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
चौकट
कुटुंबियांची चौकशीची मागणी
जर आमदार निवासामध्ये वेळेत म्बुलन्स आली असती तर माझ्या वडिलांना जीव गमावावा लागला नसता, असे चंद्रकांत धोत्रे यांच्या मुलाने सांगितले. अम्बुलन्सच्या 108 क्रमांकावर वारंवार फोन केले. मात्र म्बुलन्स वेळेत आलीच नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की आमदार निवासमध्ये 24 तास एक म्बुलन्स असावी. या प्रकाराच्या चौकशीची मागणी धोत्रे कुटुंबियांनी केली आहे

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘त्या’ चिमुरडीच्या चौकशी प्रकरणाला‘संशया’चा वास, बदलापूरचं प्रकरण दडपलं नाही,पण सोलापूरचं दबतंय का?
Next Article राजस्थान : बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना जन्मठेप

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?