Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाकरे सरकारला मोठा धक्का, नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

ठाकरे सरकारला मोठा धक्का, नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव

Surajya Digital
Last updated: 2022/06/24 at 11:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी

मुंबई : शिवसेनेच्या  शिंदे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. गुवाहाटीत असलेल्या आमदारांच्या बैठकीत उपसभापती नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 46 आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. Big blow to Thackeray government, decision to expel Narhari Jirwal is politics

बंडखोर गटाच्या ४६ आमदारांच्या सह्या घेऊन प्रस्तावाच्या तयारीसाठी कार्यवाही सुरू असल्याचीही माहिती आहे. सात पानी पाठवलेल्या पत्रामध्ये ३४ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे काल ( गुरुवारी ) रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. त्यांनी आपले संरक्षण सोडले असून आपण अज्ञातस्थळी जात असल्याचे म्हटले होते. शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री हे सुद्धा संरक्षण सोडून परराज्यात गेले आहेत.

परराज्यात जाण्यापूर्वी या आमदारांनी आपले संरक्षण मुंबईतच सोडले आणि ते अज्ञात स्थळी गेले. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सध्या सर्व राजकीय घडामोडीसाठी महत्वाची व्यक्ती ठरू लागले होते. नवीन गटनेते पदाची अथवा प्रतोद याची नेमणूक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या सर्व घडामोडीत झिरवाळ यांनीही संरक्षण सोडले आणि ते सुद्धा अज्ञात स्थळी गेले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/567911374886596/

 

आमदार अजय चौधरी यांची राज्य विधानसभेतील शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावाला विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ मंजुरी दिली. यासंदर्भातील पत्र उपसभापती कार्यालयाकडून शिवसेनेच्या कार्यालयीन चिटणीसांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना झटका बसला आहे.

□ सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत आता कायदेशीर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्याकडे आलेली यादी संशयास्पद असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात आता नवीन पैलू समोर आला आहे. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. तर प्रतोदपदी सुनील प्रभू कायम आहेत. दरम्यान शिंदे यांच्या गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेना पक्षाचे प्रत्येक म्हणून भरत गोगावले यांचे नाव सुचवले आहे त्यांच्यासोबत 34 आमदारांची यादी पाठवली आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी प्रत्यक्ष हजर रहावे किंवा कसे याबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाची मान्यता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/567867741557626/

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Bigblow #Thackeray #government #decision #expel #NarhariJirwal #politics, #ठाकरे #सरकार #मोठा #धक्का #नरहरीझिरवाळ #हकालपट्टी #ठराव #राजकारण #सभागृह
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रात मान्सून दाखल तर कृषीमंत्री शेतक-यांना वा-यावर सोडून आसामच्या चिंतन शिबिरात दाखल
Next Article एकनाथ शिंदे ‘त्या’ विधानावरून पलटले, पण सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?