अहमदाबाद : क्रिकेट विश्वात भारतीय संघाचा आणि भारतीय क्रिकेट मंडळाचा दबदबा आहे. त्यात आज आणखी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. भारताने जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान बनवून दाखवले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज या मैदानाचे लोकार्पण झाले. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हे मैदान तयार करण्यात आले आहे.
मोटेरा नावाने असलेल्या या मैदानाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. आज जगातील सर्वात मोठ्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन झाले आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हे उद्घाटन झाले. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, या उद्वाटन सोहळ्यानंतर तेथे भारत आणि इंग्लंड यांच्यात येथे डे नाईट कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम म्हणजेच मोटेरा स्टेडियमवर आज बुधवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे. हा सामना सुरु होण्याआधी पुर्नबांधणी करण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या स्टेडियमचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावेळी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, क्रीडामंत्री किरण रिजिजू, आदी मान्यवर देखील उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने दुपारी २.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
हे नवीन मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. तसेच या स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहेत. या स्टेडियमची आसनक्षमता १ लाख १० हजार एवढी आहे. या नवीन स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. तसेच ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जीम आणि ऑलिंपिक साईज स्विमिंग पूल देखील आहे. त्याचबरोबर या स्टेडियममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.
भारत-इंग्लंड संघात होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी ५५ हजार प्रेक्षक उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. कारण या स्टेडियमची आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे.
* जगातील सर्वात मोठे स्टेडियम
मोटेरा स्टेडियम हे पुर्नबांधणी केलेले स्टेडियम असून आता ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. बरोबर १ वर्षांपूर्वी म्हणजेच २४ फेब्रुवारी २०२० रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रेम्प हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात अहमदाबाद येथे स्वागत करण्यात आले होते. त्यावेळी मोटेरा स्टेडियमवर मोठा कार्यक्रमही घेण्यात आला होता.