नवी दिल्ली, २५ ऑगस्ट: केंद्र सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची सुरक्षा पुन्हा दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित केली आहे. २० ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्यानंतर तात्पुरत्या दिलेली सीआरपीएफची ‘झेड श्रेणी’ सुरक्षा आता परत घेण्यात आली आहे.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, आता दिल्ली पोलिस मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पुन्हा सांभाळतील. याआधी, हल्ल्यानंतर केंद्राने तात्काळ सीआरपीएफ सुरक्षा मंजूर केली होती.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी राजेश खीमजी हा गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे.