Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

admin
Last updated: 2025/03/24 at 8:46 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 24 मार्च (हिं.स.) – बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्रां’वर उत्तर प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी आणण्याबाबत केलेल्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याचे नुकतेच आदेश दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी करण्यात आली होती. या वेळी समितीचे मुंबई येथील सतीश सोनार, रवी नलावडे आणि नांदेड येथील शिवसेनेचे आमदार आनंद तिडके (बोंडारकर) हे उपस्थित होते. ‘सेक्युलर’ व्यवस्था असतांना धार्मिक आधारावर उत्पादनांचे प्रमाणिकरण हे घटनाबाह्य असून जर महाराष्ट्रात हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घातली गेली, तर आम्ही या निर्णयाचे स्वागतच करू, असेही समितीने म्हटले आहे.

खाद्यपदार्थांच्या संदर्भात कायद्यानुसार ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) या शासकीय संस्थेला खाद्यपदार्थांचे मानके ठरवण्याचा व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला आहे; मात्र ‘हलाल प्रमाणन’ ही एक समांतर प्रणाली उभी करण्यात आली आहे, जी खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत भ्रम निर्माण करून सरकारी नियमांचे उल्लंघन करते. महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी आणण्यात आली. स्वत: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनीही खाजगी संस्थांना प्रमाणपत्र वाटप करून पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच हा पैसा लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आदी आतंकवादी संघटनांच्या सुमारे ७०० आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी वापरला जातो, हे अतिशय धक्कादायक आहे. म्हणूनच या संदर्भात निवेदनासह काही कागदपत्रेही उपमुख्यमंत्री शिंदे यांना सादर करण्यात आली होती.

या संदर्भात महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या खाजगी संस्थांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी; हिंदूंच्या संविधानिक अधिकारांवर आघात करणार्‍या हलाल प्रमाणिकरणावर त्वरित बंदी आणावी; हलालच्या नावाखाली खाजगी संस्थांनी जमा केलेल्या निधीची चौकशी करून कारवाई करावी; हलाल प्रमाणपत्रांतून जमा केलेली अवैध संपत्ती व्याजासह वसूल करावी; या पैशाचा उपयोग कुठे केला आणि त्यातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला का, याबाबतही सखोल चौकशी करावी, अशा मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले आहेत.

You Might Also Like

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला

आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाशकात भेसळ युक्त पनीर केले नष्ट
Next Article फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव, कुणी केला ठराव?

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?