Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नोटबंदी : 2 हजाराची नोट बंद होणार; या तारखेपर्यंत बँकेत जमा करा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

नोटबंदी : 2 हजाराची नोट बंद होणार; या तारखेपर्यंत बँकेत जमा करा

Surajya Digital
Last updated: 2023/05/19 at 7:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे 2000 च्या नोटा चलनातून काढल्या जाणार आहेत. यापुढे या नोटा छापल्या जाणार नाहीत. मात्र सध्या चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहे. Demonetization: 2000 note will be discontinued; Bank Deposit RBI PTI by this date

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे या नोटा छापल्या जाणार नाहीत. तसेच 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येतील. एका वेळी बँकेत 20,000 रुपयांपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळतील. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा सर्व बँकांमध्ये जमा करता येतील. तसेच बदलूनही मिळतील.

रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोट मागे घेतली जाणार आहे. परंतु नोटांची यापुढे छापाई बंद केली जाणार आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे.

 

RBI to withdraw Rs 2,000 currency notes from circulation; the notes will continue to be legal tender till September 30: Statement

— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2023

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.

2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.

संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती.

 

भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. भारत सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्याच निर्णय घेतला होता. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रात्री 8 वाजता संबोधित करताना हा निर्णय जाहीर केला होता. रात्री 12 नंतर 500 आणि 1000 रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात 500 आणि नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरु केली होती.

 

You Might Also Like

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज

नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार

दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक

भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी

इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपल्याचा ट्रम्प यांचा दावा

TAGGED: #Demonetization #2000note #discontinued #Bank #Deposit #RBI #PTI #date, #नोटबंदी #2हजाराचीनोट #बंद #तारखेपर्यंत #आरबीआय #बँक #जमा #पीटीआय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुरक्षा साहित्यविनाच सफाई कर्मचार्‍यांकडून होतेय ड्रेनेजची स्वच्छता, सांगा, मनपा का जीवावर उठतेयं !
Next Article सोलापुरात ‘धक्कादायक’ घटना; अठरा दिवसाच्या नवजात बाळाची विक्री, दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?