सोलापूर/प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २०७ शाखेच्या माध्यमातून पाच हजार कोटींचा ठेविचा टप्पा पूर्ण केला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते .जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी स्वमंगल करत बँकेला आर्थिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला.सोलापूर जिल्ह्यातील बडी हस्ती ही बँकेची थकबाकीदार आहेत.त्यांच्याकडे करोडो रुपये थकीत आहे.असे असतानाही संचालक मंडळची मुदत अंती बँक आर्थिक दृष्टीने डबघाईस आली होती.बरखास्त होताच प्रशासक राज आले.
विद्यमान प्रशासक कुंदन भोळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी सभासद आणि कर्मचारी ठेवीदार यांच्या सहकार्याने बँकेने पाच हजार कोटींचा सुरक्षा ठेव टप्पा पूर्ण केला आहे.यावेळी भोळे यांनी सण मार्च २०२५ पर्यत पाच हजार ३०० कोटीचे उद्दिष्ट होते त्यापैकी ५हजार कोटींची टप्पा पूर्ण केला आहे. ७० टक्के डिपॉजिट वयक्तिक ठेवीदारांचे आहे ३० टक्के संसस्थाचे आहे.सर्वांच्या सहकार्याने बँकेने उद्दिष्ट पूर्ण केलं आहे.उद्दिष्ट पूर्ण केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी ,राजेंद्र शिंदे,व्यवस्थपक- राजेंद्र गोटे व्यवस्थपक,डिसीसी कर्मचारी संघटना अध्यक्ष संजय(मामा) शिंदे सचिव- राजेश गवळी यासह सर्व स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.
* – सर्व सामान्य शेतकरी,ठेवीदार खातेदार या सर्व स्तरीय लोकांचा बँकेवर विश्वास वाढला आहे.ठेवीवर सर्वाधिक व्याज असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा:
* – कुंदन भोळे प्रशासक डीसीसी बँक, सोलापूर