Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अजय चौधरींची नियुक्ती अवैध; शिंदेंचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

अजय चौधरींची नियुक्ती अवैध; शिंदेंचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र, मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान

Surajya Digital
Last updated: 2022/06/22 at 5:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेने त्यांना गटनेते पदावरून हटवले होते. त्यानंतर अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली होती. पण आता ही नियुक्ती अवैद्य आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना बंडखोर 34 आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठविले आहे. Ajay Chaudhary’s appointment illegal; Eknath Shinde’s letter to Assembly Deputy Speaker, challenge to Chief Minister Thackeray

‘शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत’, असे ट्विट आज एकनाथ शिंदे यांनी केले आहे. शिंदेंच्या या धक्कादायक निर्णयाने शिवसेना काय निर्णय घेते, याकडे लक्ष आहे. शिंदेंच्या या ट्विटमुळे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यात आले आहे.

विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, शिंदे यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही उपस्थित आहेत. त्यात आज सायंकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शंभूराज देसाई यांना नोटीस पाठवून बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पक्षाच्या बैठकीला हजर रहा नाही तर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

“शिवसेनेने कुठलेही बंड केलेले नाही. शिवसेना आमदारांनी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार यापासून शिवसेना आमदार कधीही फारकत घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे. बाळासाहेबांचा नारा हा बुलंद केला जाईल. बाळासाहेबांचे हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी सुरत येथून निघताना दिली होती.

“शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही सर्व जण बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत. मला कोणावर टीका करायची नाही. इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जायचे आहे. माझ्यासोबत ४० आमदार इथे आले आहेत आणि आणखी १० येणार आहेत,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले आहेत. महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदेंची मनधरणी सुरू असतानाच इकडे कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑनलाईन पद्धतीने बैठकीसाठी उपस्थित होते. आजच्या कॅबिनेट बैठकीसाठी शिवसेनेचे फक्त तीनच मंत्री उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.

 

You Might Also Like

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

टाटा मेमोरियलमध्ये कर्करोगावरील भारतातील पहिल्या हाय डोस एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग

परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच – ॲड. आशिष शेलार

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, पुढील आठवड्यात घोषणा

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

TAGGED: #AjayChaudhary #appointment #illegal #EknathShinde #letter #Assembly #DeputySpeaker #challenge #ChiefMinister #Thackeray, #अजयचौधरी #नियुक्ती #अवैध #एकनाथशिंदे #विधानसभा #उपाध्यक्ष #पत्र #मुख्यमंत्री #ठाकरे #आव्हान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेनेतील बंड… ठाकरे यांना सत्तेचा मोह आवरला नाही (ब्लॉग)
Next Article एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपद द्या; शरद पवारांनी ठाकरेंना सल्ला दिल्याची चर्चा

Latest News

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
टाटा मेमोरियलमध्ये कर्करोगावरील भारतातील पहिल्या हाय डोस एमआयबीजी थेरपीचा यशस्वी प्रयोग
महाराष्ट्र June 28, 2025
परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच – ॲड. आशिष शेलार
महाराष्ट्र June 28, 2025
भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण, पुढील आठवड्यात घोषणा
महाराष्ट्र June 28, 2025
शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख
राजकारण June 28, 2025
पालकमंत्र्यांच्या हस्ते 12 भूमिहीन लाभार्थ्यांना शेतजमिनीचे वाटप
महाराष्ट्र June 28, 2025
जनवाद कार्यक्रम विविध विषयांचे निवेदन प्राप्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला नागरिकांशी संवाद साधला
महाराष्ट्र June 28, 2025
मुंबई-रेवा विशेष गाड्यांच्या २६ सेवा वाढवल्या
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?