सोलापूर : शेतकऱ्यांकडून खरेदी होत असलेल्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, दुधाला 30 रुपये भाव द्यावा, दूध भुकटीला प्रतिकिलो ५० रुपये निर्यात अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी आज शनिवारी भाजपच्या वतीने मंद्रूप येथे महाविकास आघाडीच्या विरोधात महाएल्गार आंदोलन झाले.
हे आंदोलन दक्षिण सोलापूरचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झाले. यावेळी जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, पं.स सदस्य एम.डी. कमळे, पं.स.सदस्य-संदिप टेळे , युवा नेते मळसिद्ध मुगळे, तालुका सरचिटणीस संगप्पा केरकी, युवा मोर्चा उपाध्यक्ष आण्णाराव पाटील, शिव पाटील, दयानंद ख्याडे, शशिकांत पाटील, ग्रा.पं.सदस्य अतुल गायकवाड , शिवराय साखरे, सतीश पटणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा इरादा केला आहे का? या सरकारच्या काळात पाणी 25 रुपये लिटर आहे. मात्र दूध 17-19 रुपये लिटर आहे. येणाऱ्या काळात तातडीने जर सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाही तर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा देण्यात आला
दक्षिण सोलापूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. दुधाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरकारने लवकरात लवकर दूध दरवाढ करावी अन्यथा भाजपच्या वतीने सर्वत्र तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी दिला.