Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा : मंदिर परिसरात ड्रोन कॅमेराव्दारे चित्रिकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा : मंदिर परिसरात ड्रोन कॅमेराव्दारे चित्रिकरण

Surajya Digital
Last updated: 2022/10/13 at 9:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ कांद्याच्या दरात तेजी येण्यास सुरुवात

पंढरपूर : श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ व मार्ग विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा सुधारित सर्वकंष आराखडा तयार करण्यात येत आहे. Pandharpur Pilgrimage Development Plan: Drone camera footage of the temple area

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये कोणत्या सूचनांचा समावेश करता येईल या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदीर व मंदीर परिसरात ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रिकरण करण्यात येत आहे.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. याबाबत प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत आवश्यक सुविधा देण्यासाठी सर्वसमावेशक असा आराखडा तयार करण्यात येत आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यासाठी मंदिर , मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, नदीवरील घाट, बंधारे आदी ठिकाणचे ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रिकरण करण्यात येत आहे. चित्रिकरणास कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस प्रशासन, मंदिर समिती येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत चित्रिकरण करण्यात येत आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यादृष्टीनेही आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी मंदीर समिती व वास्तुविशारद यांच्यामार्फत कामकाज करण्यात येणार आहे.

मंदिर परिसरात ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रिकरण करतेवेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहा.पोलीस निरिक्षक चिमनाजी केंद्रे, मंदीर समितीचे अभियंता केतन भोंगे तसेच चितानंद सर्वगोड, महेश कांबळे उपस्थित होते.

 

 

 

□ कांद्याच्या दरात तेजी येण्यास सुरुवात

#सुराज्यडिजिटल
#onions #कांदा #surajyadigital #prise #दर

 

 

मुंबई- दिवाळीपूर्वी कांद्याचे दर वाढत आहेत. घाऊक बाजारात मागील आठवड्यापर्यंत 7 ते 10 रुपये किलो असलेल्या कांद्याच्या दरात आता वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी एक किलो कांदा 15 ते 25 रुपये किलो झाला आहे. परतीचा पाऊस पडत असल्याने कांद्याची नवीन लागवड संकटात आली आहे. याचाच परिणाम म्हणून हे दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Pandharpur #Pilgrimage #Development #Plan #Dronecamera #footage #templearea, #पंढरपूर #तीर्थक्षेत्र #विकास #आराखडा #मंदिरपरिसर #ड्रोनकॅमेराव्दारे #चित्रिकरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता; आत्महत्येचा संशय
Next Article अक्कलकोट । वीज पडून पाचजण जखमी; तीन गंभीर जखमी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?