Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहराचा वीस वर्षासाठीचा विकास आराखडा दोन वर्षात होणार तयार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहराचा वीस वर्षासाठीचा विकास आराखडा दोन वर्षात होणार तयार

Surajya Digital
Last updated: 2022/10/21 at 10:44 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ उड्डाणपूल अवॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना

□ हैदराबादच्या आरएसआय कंपनीकडून कामास सुरुवात

 

Contents
□ उड्डाणपूल अवॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना□ हैदराबादच्या आरएसआय कंपनीकडून कामास सुरुवातस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ महापालिका आयुक्तांमुळे १२ कोटींची बचत□ उड्डाणपूल अवॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना : आयुक्त

सोलापूर : महापालिकेच्या वतीने शहराच्या पुढील २० वर्षाचा विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा संपूर्ण आराखडा तयार करण्याचे काम सन २०२४ पर्यंतपूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. 20 year development plan of Solapur city will be ready in two years Hyderabad RSI

 

महापालिकेच्या वतीने हैदराबाद येथील आरएसआय या कंपनीला हा विकास आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले. या कंपनीकडून शहरातील १७८ चौरस किलोमीटर ड्रोन सर्वेचे काम पूर्ण झाले आहे. याचा संपूर्ण डाटाही पुणे जमाबंदी आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्याची प्रक्रिया शासनाकडून करण्यात येणार आहे.तर महापालिका त्याचे पैसे अदा करणार आहे. महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाजवळ याचे कार्यालय राहणार आहे. तेथूनच शहरातील सर्व प्रकारची कार्यवाही होणार आहे.

चालू विकास आराखड्याची मुदत सन २०२४ पर्यंत यापूर्वी १९९७ मध्ये चालू विकास आराखडा तयार करण्यात आला होता. त्याला सन २००४ मध्ये मान्यता मिळाली होती. शहरातील सध्या चालू असलेल्या विकास आराखड्याची मुदत ही सन २०२४ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी नवा आराखडा तयार करण्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ महापालिका आयुक्तांमुळे १२ कोटींची बचत

दरम्यान, ड्रोन सर्वेक्षणाचे काम झाले आहे. या ड्रोन सर्वेक्षणासाठी इतर महापालिकांना सुमारे 14 कोटी रुपयांचा खर्च आला होता मात्र सोलापूर महानगरपालिकेने हेच काम सबंधितांकडून केवळ दीड कोटी रुपयांमध्ये पूर्ण केले आहे. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या प्रयत्नामुळे महापालिकेची सुमारे १२ कोटी ५० लाख रुपयांची बचत झाली आहे. हे विशेष!

 

□ उड्डाणपूल अवॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना : आयुक्त

शहरातील होणाऱ्या प्रस्तावित दोन उड्डाणपूलांच्या पैकी जुना पुना नाका ते पत्रकार भवन या फेज वन मधील उड्डाण पुलाच्या अवॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यासाठी भूसंपादन अधिकारी केशव जोशी यांना सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.

शहरातील होणाऱ्या प्रस्तावित दोन उड्डाणपूलांच्या पैकी जुना पुना नाका ते पत्रकार भवन या फेज वन मधील उड्डाण पुलाच्या अवॉर्डसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यासाठी भूसंपादन अधिकारी केशव जोशी यांना सूचना देण्यात आली आहे. याचे मूल्यांकनाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.

दरम्यान, उड्डाणपुलासाठी बाधित होणाऱ्या शासकीय जागा पॅकेज न देता विनामूल्य देता येते असे नगर विकास विभागाच्या सचिवांनी सांगितले आहे. त्यानुसार महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय फेज दोन मधील उड्डाणपुलाचे ७० टक्के मूल्यांकन काम पूर्ण झाले आहे. भूसंपादनाचे अवॉर्डचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीचे ८०० कोटीचे अंदाजपत्रक १२०० कोटीवर गेल्याने यानुसार टेंडर काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #20year #development #plan #Solapurcity #ready #twoyears #Hyderabad #RSI, #सोलापूर #शहर #२०वर्ष #विकास #आराखडा #दोनवर्ष #तयार #महानगरपालिका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमर शेख : सुपुत्र बार्शीचा, शाहीर हा महाराष्ट्राचा
Next Article शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांना मंदिर समितीकडून निमंत्रण

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?