Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फडणवीस आणि राऊत यांच्यात गळाभेट; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

फडणवीस आणि राऊत यांच्यात गळाभेट; अनेकांच्या भुवया उंचावल्या

Surajya Digital
Last updated: 2021/02/01 at 9:41 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा रविवारी पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही या सोहळ्याला हजर राहिले. या सोहळ्यात राऊत यांनी फडणवीस यांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होते. हे दृश्य पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या वर्षभरात न दिसलेलं चित्र पाहायला मिळालं.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या लेकीचा साखरपूडा काल रविवारी पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा साखरपुडा झाला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. या सोहळ्यात विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* जोरदार वाकयुद्ध झाले होते

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरुन बेबनाव झाला. पुढे संजय राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यातून अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर गेल्या वर्षभरात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध पाहायला मिळालं. खुद्द संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनीही एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी केली आहे. त्यामुळे आज राऊतांच्या कन्येच्या साखरपुड्यात दिसलेलं चित्र अनेकांसाठी भुवया उंचावणारं आहे.

* समोरासमोर आल्यानंतर झाली गळाभेट

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्यानंतर नव्या जोडप्यासह नार्वेकर आणि राऊत कुटुंबियांसोबत फडणवीसांनी फोटो काढले. त्यानंतर दरेकर यांनी पुढे होत नव्या जोडप्याला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. तेव्हा राऊतांनीही पुढे होत दरेकरांच्या हातात हात दिला.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #फडणवीसआणिराऊत #यांच्यातगळाभेट #अनेकांच्या #भुवया #उंचावल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अण्णा हजारे हे राजकीयदृष्ट्या हास्यास्पद व्यक्तिमत्व; ‘अविश्वासू’ आणि ‘मॅनेज’ होणारे समाजसेवक
Next Article शरद पवारांचे केंद्रीय कृषीमंत्री तोमरांना प्रतिउत्तर, लोकांना कृषी कायद्याबाबत सत्य सांगावे

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?