Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुळजापूरला जाणा-या भाविकांचे चोरलेले 17 मोबाईल जप्त; दोन अट्टल चोरट्यांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

तुळजापूरला जाणा-या भाविकांचे चोरलेले 17 मोबाईल जप्त; दोन अट्टल चोरट्यांना अटक

Surajya Digital
Last updated: 2022/10/11 at 3:31 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ फौजदार चावडी डी.बी पथकाची कामगिरी

सोलापूर : तुळजापूर येथे देवदर्शनाकरिता जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेवून सोलापूर शहर व जिल्हा तसेच आजूबाजूचे परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील १७ मोबाईल असे एकूण २ लाख १ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला. 17 stolen mobile phones of devotees going to Tuljapur seized; Two persistent thieves arrested in Solapur

Contents
□ फौजदार चावडी डी.बी पथकाची कामगिरीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा !

फिर्यादी बार्शी येथील सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब अनंतराव देशपांडे हे रविवारी ( दि.९ ) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर एस.टी.स्टॅन्ड येथे बार्शीला जाणारे एस.टी.मध्ये चढत असताना पाठीमागून अचानक एका अनोळखी इसमाने खिशातील मोबाईल हिसकावून घेवून पळुन गेला. फिर्यादीने आरडा ओरडा केला परंतु तो गर्दीत घुसून पळून गेला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्यामधील इसमांचा शोध घेत असताना, जुना कारंबा नाका ते प्रभाकर महाराज मठाचे दरम्यान नाकोडा रेसिडेन्सीसमोरील मोकळ्या मैदानात दोन इसम मोबाईल विकण्याकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावेळी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्याचेकडे एकूण १७ मोबाईल मिळून आले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

या मोबाईलची तपासणी केली असता ते मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेले असल्याचे सांगितले. आनंद अंबादास मंजेली (वय-३२, रा. जुना अक्कलकोट नाका, शनि मंदिरासमोरील झोपडपट्टी, अक्कलकोट रोड, सोलापूर) व अंबादास भगवान शिंदे (वय-३२,रा.जोशी गल्ली, भोलाभाई चौकाजवळ, रविवार पेठ,सोलापूर) असे या सराईत चोरट्यांची नावे आहेत.

 

ही कामगिरी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील,दु पोनि‌ विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस नाईक डोके, बाबर, बागलकोटे, बडुरे, व्हटकर, मोरे, लवटे, खरटमल, चव्हाण, चानकोटी, दराडे, गायकवाड यांनी केली आहे.

 

 

□ जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा !

 

#जागतिक #कन्या #surajyadigital
#children #worldgirl #सुराज्यडिजिटल #शुभेच्छा #मुलगी #कन्यादिन

 

 

□ मुलगी म्हणजे करूणा आणि प्रेरणा यांचा संगम असते. मुलगी कुटुंबाचे आयुष्य आणि समाजाचे भविष्य असते. तिला स्वातंत्र्य, सन्मान आणि सुरक्षा मिळवून देऊया. स्त्री जन्माचे स्वागत करुन तिच्या पंखांना बळ देऊया. जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा !

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #stolen #mobilephones #devotees #Tuljapur #seized #persistent #thieves #arrested #Solapur, #सोलापूर #तुळजापूर #भाविक #चोरलेले #मोबाईल #जप्त #अट्टल #चोरट्यांना #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अखेर शिंदे अन् ठाकरे गटाला मिळालं नाव, अंधेरी पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार
Next Article बीड हादरले, भाजप शहराध्यक्षने घेतली स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?