Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

admin
Last updated: 2025/06/26 at 4:11 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 26 जून (हिं.स.) : देवशयनी आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त साधत अखंड विठ्ठलमय वातावरणात रसिक भक्तांना भक्तिरसात न्हालवणारा एक आगळावेगळा संगीत सोहळा — ‘अवघे गर्जे पंढरपूर’ रंगणार आहे रविवार, ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.

भगवंत प्राप्ती हेच मानवी जीवनाचे साध्य असून त्याची प्राप्ती झाल्यानंतर बाकी काहीच शिल्लक राहात नाही. कर कटावरी असलेल्या त्या सावळ्या विठ्ठलाचे समचरण पाहिले की परत फिरणे नाही. त्या माय बापाच्या दर्शनाला देश परदेशाच्या सीमा ओलांडून लाखो भाविक विठ्ठल नामाचा जयघोष करत वारीत चालत येतात.भक्ती आणि वारीच्या गजरात दुमदुमणारा जयघोष’ अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष वारीत जाण्याची आपली संधी हुकली असेल तर हा अनुभव गायनातून घडविण्यासाठीच ‘एएसके’ व ‘दर्शन क्रिएशन्स’ आणि ‘अद्वैत थिएटर्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राहुल भंडारे, समीर बापर्डेकर आणि अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून सादर होणाऱ्या ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या कार्यक्रमातून घेता येणार आहे. अथांग भक्ति सागरात टाळ-मृदंगाच्या गजरात रसिकांना हा कार्यक्रम विठ्ठलमय करणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व एम. के. घारे ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑप. सोसायटी, मिनी मॅक्स ऍड्स प्रा. लि. ने स्वीकारले आहे.

या कार्यक्रमात ‘संगीत संन्यस्त खड्ग’, ‘संगीत हाच मुलाचा बाप’, ‘संगीत एकच प्याला’ इत्यादी नाटकांमधील आघाडीची अभिनेत्री अर्थात प्रसिद्ध गायिका संपदा माने, गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई आणि स्वरा जोशी हे गुणी गायक-गायिका आपले सुरेल गायन सादर करतील. या भक्तिरसपूर्ण गायनाला संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांचे संगीत लाभणार असून, रसिकांची भक्तीची वाट आणखीनच अर्थपूर्ण करणारे निवेदन दीपाली केळकर यांच्या ओघवत्या शैलीतील आवाजातून साकारले जाणार आहे.

‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा कार्यक्रम केवळ एक संगीत सादरीकरण नसून, तो एका आध्यात्मिक अनुभूतीचा जागर आहे. अशा या पवित्र संगीतमय यात्रेचा लाभ घेण्यासाठी आणि विठुरायाच्या भक्तीने अंत:करण भरून टाकण्यासाठी, प्रत्येक भक्ताने रविवार, ६ जुलै, दुपारी ४ वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे उपस्थित राहून या सशुल्क कार्यक्रमाला भरभरून दाद द्यावी.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
Next Article ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?