नवी दिल्ली, 24 जुलै — नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने एअर इंडियावर कारवाईचा बडगा उगारला आहे. क्रू ड्युटी, विश्रांती नियम, प्रशिक्षण नियम व ऑपरेशनल प्रक्रियांतील गंभीर उल्लंघनं केल्याच्या कारणावरून DGCA ने चार ‘कारणे दाखवा’ नोटीसा जारी केल्या आहेत.
कशामुळे आली कारवाई?
एअर इंडिया एअरलाइनने 20 आणि 21 जून रोजी DGCA ला स्वेच्छेने काही खुलासे केले होते. या खुलाशांच्या आधारे 23 जुलै रोजी चार नोटीसा देण्यात आल्या. यात मुख्यतः खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे:
-
लांब पल्ल्याच्या चार उड्डाणांमध्ये क्रू विश्रांती नियमांचे उल्लंघन (27 एप्रिल 2 उड्डाणे, 28 एप्रिल व 2 मे – प्रत्येकी 1)
-
क्रू प्रशिक्षण नियमांचे उल्लंघन (उड्डाणे – 26 जुलै 2024, 9 ऑक्टोबर 2024, 22 एप्रिल 2025)
-
साप्ताहिक विश्रांती आणि ड्युटी नियमांचे उल्लंघन (उड्डाणे – 13 जून 2025, 24 जून 2024)
एअर इंडियाचे उत्तर
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं की,
“गेल्या एका वर्षात काही स्वेच्छेने खुलासे केल्यानंतर आम्हाला DGCA कडून सूचना मिळाल्या आहेत. आम्ही या नोटीसांना ठरलेल्या वेळेत उत्तर देऊ. आमच्या प्रवाशांच्या व क्रूच्या सुरक्षेसाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत.“
12 जूनचा धक्कादायक अपघात
12 जून 2024 रोजी, अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे बोईंग 787 विमान लंडन गॅटविकसाठी निघाले होते. काही वेळातच हे विमान एका इमारतीला धडकले, आणि या दुर्घटनेत 279 प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर DGCA कडून एअर इंडियाच्या विविध कामकाज प्रक्रियांवर तपासणी सुरू करण्यात आली.