Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धाराशिव जिल्ह्यातील 1373 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची मदत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

धाराशिव जिल्ह्यातील 1373 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजारांची मदत

admin
Last updated: 2025/10/01 at 5:08 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत घरदार, संसार उध्वस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील कुटुंबांना जिल्हा प्रशासनाकडून दिलासा मिळू लागला आहे. पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या एकूण १३७३ कुटुंबांना मागील दोन दिवसात प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत वाटप करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण ३२०६ कुटुंबे पुराच्या पाण्याने बाधित असून त्यांना मदतीसाठी पात्र धरले गेले आहे. यामध्ये धाराशिव २१७, तुळजापूर १०५, उमरगा २५०, कळंब ४१३, भूम ७१२, परंडा १४०० आणि वाशी १०९ कुटुंबांचा समावेश आहे.

२९ सप्टेंबर रोजी ३५३ कुटुंबांना मदत वाटप करण्यात आली. यामध्ये धाराशिव ६५, कळंब २०८ व परंडा ८० कुटुंबांचा समावेश आहे. तर ३० सप्टेंबर रोजी १०२० कुटुंबांना दिलासा देण्यात आला. त्यामध्ये धाराशिव ५०, कळंब ४०, भूम ५०८, परंडा ३१३ व वाशी १०९ कुटुंबांचा समावेश आहे.

या दोन दिवसांत धाराशिव तालुक्यातील ११५, कळंब २४८, भूम ५०८, परंडा ३९३ व वाशी १०९ कुटुंबांना प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे.

पूराच्या पाण्याने उध्वस्त झालेल्या संसाराला पुन्हा उभारी देण्यासाठी ही आर्थिक मदत दिलासादायक ठरत आहे. प्रशासनाकडून उर्वरित पात्र कुटुंबांनाही लवकरच मदत पोहोचवली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भामरागडमध्ये घातपातासाठी रेकी करणाऱ्या कट्टर नक्षल समर्थकाला अटक
Next Article आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वृद्ध पित्यानेही अवघ्या 12 तासातच सोडले आपले प्राण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?