Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: mindset औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव झाले, सरकार पडण्याची तयार केली मानसिकता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

mindset औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव झाले, सरकार पडण्याची तयार केली मानसिकता

Surajya Digital
Last updated: 2022/06/29 at 9:09 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
□ मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट सदस्यांना म्हटले धन्यवाद !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेची शिवसेनेवर टीका

□ मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट सदस्यांना म्हटले धन्यवाद !

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad became the mindset of Uddhav Thackeray

याशिवाय उस्मानाबादचं नामकरण धाराशीव करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असून बैठकीत नेमकं काय घडलं याचा खुलासा केला आहे.

याशिवाय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील काही निर्णय देखील घेण्यात आले आहेत. “राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार. कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार, अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार आहे.”

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत शहरांचे नावं बदलल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमधील सर्व सदस्यांचे आभार मानले आहे. मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, मला माझ्याच लोकांनी धोका दिल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे ही कॅबिनेटची शेवटची बैठक होती, असेही बोलले जात आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यामध्ये उद्धव ठाकरे भावूक झालेले पाहायला मिळाले. माझ्या लोकांनी मला धोका दिल्याचे वक्तव्य त्यांनी केले असून, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. त्याबरोबर मित्रपक्षांनी अडीच वर्ष भक्कम साथ दिल्याचेही त्यांनी मान्य केले.

 

‘या अडीच वर्षामध्ये मी कुणाचे मन दुखावले असेल किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा’ असे म्हणत त्यांनी मित्रपक्षांची आणि मंत्र्यांचे क्षमा देखील मागितली. त्यांचे हे भाषण ऐकून कदाचित त्यांनी ही मानसिक तयारी करून उद्या सरकार पडणारच आहे, असे गृहीत धरले आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्या बहुमत चाचणी होणार असून यामध्ये सरकार पडण्याचे पूर्ण चिन्हे दिसत आहेत. कदाचित, ही राज्य मंत्रिमंडळाची उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची बैठक ठरू शकते.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आज वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन काम करत असताना केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं. दोन्ही पक्षांचं सहकार्य मिळालं, पण माझ्या पक्षाच्या काही लोकांनी दगा दिला, हे दुर्भाग्य आहे. त्यांनी साथ दिली नाही, याबद्दल दु:ख व्यक्त केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो,” असं मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसेची शिवसेनेवर टीका

मुंबई : एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार गुवाहटीहून मुंबईत येणार आहेत. मात्र, काल उद्धव ठाकरेंनी आमदारांना भावनिक साद घालत घरी या असं सांगितलं. हा सगळा भावनिक बनाव असल्याचे मनसेने एका व्यंगचित्राच्या माध्यमातून सांगितले. आपण कुटुंबप्रमुख असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी आमदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला.

मनसेच्या व्यंगचित्रात पवार मागून ठाकरेंना सुरा देताना दाखवले आहेत तर उद्धव ठाकरे हातातील कागदावर लिहिलेले भावनिक भाषण फोनवर शिंदेंना ऐकवत आहेत.

या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या हातात बंडखोरांसाठी परत येण्यासाठीचं विनंती पत्र दिसत आहे. तर त्याचवेळी पाठीमागे अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच उद्धव यांच्या हातात सुरा सोपवत आहेत, असं चित्रित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदारांचं पाठबळ असल्याचे चित्रात दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्रासाठी संदीप देशपांडे यांनी काळजी आणि victimcard असे हॅशटॅग वापरले आहेत.

गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांना परत फिरण्याचं आवाहन एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मला काळजी वाटते, अजूनही वेळ गेली नाही. समोर येऊन बोला आपण यातून मार्ग काढू. अशा शब्दात ठाकरे यांनी आमदारांना आश्वस्त केलं. गुवाहाटीमध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून अडकून पडला आहात.

आपल्यातील काही आमदार संपर्कात आहेत. आपणही मनाने अजूनही शिवसेनेतच आहात. काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या भावनांचा आदर करतो. अजूनही वेळ गेलेली नाही, असे ठाकरे यांनी या पत्रात म्हंटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पत्र लिहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून याला उत्तर दिले आहे. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय ? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच यावेळी #donttrickmaharashtra असा नवा हॅशटॅगही वापरला आहे.

 

You Might Also Like

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी

मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत – डॉ. नीलम गोऱ्हे

वर्धा : गांधीवादी संस्थांमध्ये नक्षलवाद्यांची घुसखोरी

राज्यात वातावरणात अस्थिरता; पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

TAGGED: #Sambhajinagar #Aurangabad #Dharashiv #Osmanabad #mindset #UddhavThackeray, #औरंगाबाद #संभाजीनगर #उस्मानाबाद #धाराशीव #उद्धवठाकरे #सरकार #मानसिकता #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Gram Panchayat Election मोठी बातमी! निवडणूकांचे बिगुल वाजले
Next Article मुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?