धाराशिव, 4 ऑक्टोबर। मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५५ गटांच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. धाराशिव येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. या सोडतीनुसार एकूण ५५ जागांपैकी ५० टक्के म्हणजेच २८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) स्वाती शेंडे, आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम २०२५ नुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली.
आरक्षणाची प्रवर्गनिहाय स्थिती:
-
एकूण जागा: ५५
-
महिलांसाठी आरक्षित: २८
-
अनुसूचित जाती (एस सी): एकूण ९ जागा, त्यापैकी ५ जागा महिलांसाठी राखीव.
-
अनुसूचित जमाती (एसटी): १ जागा.
-
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी): एकूण १४ जागा, त्यापैकी ७ जागा महिलांसाठी राखीव.
-
सर्वसाधारण (General): एकूण ३१ जागा, त्यापैकी १६ जागा महिलांसाठी राखीव.
गटनिहाय आरक्षणाचा तपशील:
जिल्हा परिषद मुलांची शाळा, धाराशिव येथील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.
-
अनुसूचित जाती (महिला): वडगाव (सि), सिंदफळ, डिकसळ, येरमाळा, व सास्तूर.
-
अनुसूचित जाती (सर्वसाधारण): सिंदफळ, काक्रंबा, शहापूर, वडगाव (सि), सांजा, डिकसळ, येरमाळा, खामसवाडी व सास्तुर.
-
अनुसूचित जमाती: ढोकी.
-
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): काटी, सुकटा, येणेगुर, वालवड, तुरोरी, मोहा आणि लोणी.
-
सर्वसाधारण (महिला): कोंड, जळकोट, तेर, मंगरूळ, ईट, बलसूर, कुन्हाळी, पारगाव, केशेगाव, माकणी, आनाळा, पारा, कानेगाव, अंबेजवळगा, कदेर व जेवळी.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण ३१ निवडणूक विभाग आरक्षित झाले आहेत, त्यापैकी १६ विभाग सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत.