Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दूधदरवाढीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह तुळजापूर, उस्मानाबादमध्ये आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दूधदरवाढीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह तुळजापूर, उस्मानाबादमध्ये आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 5:40 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : दूध दरवाढीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर विविध प्रकारे आंदोलन केले जात आहे. तुळजापुरात श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच दूध ओतून आंदोलन केले. तर पंढरपुरातही आंदोलन झाले. पंढरपूर अज्ञात एकाने रस्त्यावर टायर पेटविले. ग्रामदैवत तुंगेश्वराला दूधाचा अभिषेक केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून महाविकास आघाडीचा निषेध नोंदविला. सरकारला गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ दर व ५ प्रतिलिटर ५ अनुदान देण्याची सुबुध्दी देण्याची प्रार्थना केली. तुंगत गावांसह परिसरातील दुध बंद ठेवून उत्पादकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही ही अभिषेक घालून साकडे घातले.

यावेळी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, सरपंच आगतराव रणदिवे, औदुंबर गायकवाड, नवनाथ रणदिवे, विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे, रामकृष्ण नागणे, आविराज रणदिवे, रमेश आद, गणेश रणदिवे, श्रीकांत आवताडे आदी उपस्थित होते. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे जनावरांना दुधाने अंघोळ घालून शासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान, पंढरपूर अज्ञात एकाने रस्त्यावर टायर पेटविले.

* अंबाड येथे रस्त्यांवर ओतले दूध
दूध न घेण्याची विनंती केल्यानंतरही दूध खरेदी केल्याने नेचर डिलाईट डेअरीतील दूध रस्त्यांवर ओतून अंबाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. सिध्देश्वर घुगे, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

* रिधोरे येथे ग्रामदैवताला अभिषेक
पंढरपूर तालुक्यातील रिधोरे येथील ग्रामदैवत श्री रूद्रेश्वराला दुधाचा अभिषेक करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध नोंदविला. दूध दरवाढ झालीच पाहिजे अशा घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महावीर सावळा, सिध्देश्वर घुगे, कार्याध्यक्ष शिवाजी पाटील, सत्यवान गायकवाड आदी उपस्थित होते.

* मेंढ्यांना दुधाची आंघोळ
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. वेळापूर येथील ग्रामदैवताला दुधाने अभिषेक घालून उरलेल्या दुधाने शेळ्या-मेंढ्यांना आंघोळ घालण्यात आली़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

* निभोंरेत दूध ओतले
निभोंरे येथे दुधाचे दर वाढवावे अशा घोषणा करीत आज निंभोरे येथे दूध ओतून देण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करून शांततेने कायदा सुव्यवस्थेला बाधा  न लावता सर्व शेतकऱ्यांनी शांततेत शिस्तबद्ध आंदोलन केले यावेळी निंभोरे येथील सर्व दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #दूधदरवाढ #आंदोलन #अभिषेक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तुळजापुरात बैलगाडी मोर्चा काढून एक दिवसाचे लाक्षणिक दूध आंदोलन
Next Article सोलापूर शहर हद्दीतील कोरोनाग्रस्तांची चार हजाराकडे वाटचाल; काल राञी बारापर्यंत नवीन 153 रुग्ण

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?