Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धुराडे पेटवण्यासाठी कारखाने सज्ज मात्र मागील एफआरपीचे 203 कोटी थकित
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

धुराडे पेटवण्यासाठी कारखाने सज्ज मात्र मागील एफआरपीचे 203 कोटी थकित

Surajya Digital
Last updated: 2022/09/15 at 12:39 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ १४ दिवसात बिल आदा करणे बंधनकारक□ विलंब झाल्यास व्याजासह एफआरपी देण्याची तरतूद ; मात्र कोण दाखल करणार गुन्हास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ अर्धवट एफआरपी दिलेले कारखाने

□ १४ दिवसात बिल आदा करणे बंधनकारक

□ विलंब झाल्यास व्याजासह एफआरपी देण्याची तरतूद ; मात्र कोण दाखल करणार गुन्हा

सोलापूर – चालू वर्षीचा गळीत हंगाम उंबरठ्यावर आला असून जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्याने धुराडे पेटविण्यासाठी सज्ज झाले असले तरी गेल्या हंगामातील ३१ आँगस्टपर्यंत २०३ कोटी रूपये थकित असून एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना न देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. Sugar mills ready to set fire to Dhurade, but Solapur owes 203 crores of previous FRP

ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता व गेल्यावर्षी ऊस गाळपास उशीर झाल्यांने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.याचा विचार करता १ आँक्टोबर पासून गाळप हंगाम सुरु होणार असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदार थकित एफआरपी दिवाळी पुर्वी दिली जाईल असे सांगत आहेत.

मात्र यंदा दिवाळी २० आँक्टोबर नंतर आहे.तत्पूर्वी तीन आठवडे आदीच गाळप हंगाम सुरू होत आहे. तर एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना दिला जाणार नाही असे साखर आयुक्तांचे धोरण आहे.त्यामुळे १ आँक्टोबरला साखर कारखाना सुरू करायचा झाल्यास त्या अगोदर थकित एफआरपी द्यावी लागणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

गतवर्षीच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला. आता यंदाचा हंगाम तोंडावर असतानाही त्यापैकी १८ कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांची पूर्णपणे एफआरपी दिलेली नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची सुमारे २०३ कोटी रुपयांची एफआरपी थकविली आहे.

 

जिल्ह्यात जवळपास ३६ साखर कारखाने आहेत. गतवर्षी त्यापैकी ३४ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप केले. हा गाळप हंगाम पूर्ण होऊन आता तीन महिने झाले आहेत. तरीही शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळालेले नाहीत. कायद्यानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत पूर्णपणे एफआरपी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. पण कारखान्यांनी हा कायदा पायदळी तुडवला आहे. अनेक कारखान्यांनी तरी दिलेले पैसेही तुकड्या – तुकड्यांनी दिले आहेत. तसेच विलंबाने मिळणारी एफआरपी कारखान्यांनी व्याजासह द्यावी, अशी तरतूद कायद्यात आहे. पण त्याचेही पालन होत नाही. प्रशासनही यावर गप्पच आहे. पण शेतकरी मात्र कारखान्यांकडे हेलपाटे मारत आहेत.

 

□ अर्धवट एफआरपी दिलेले कारखाने

गतवर्षीच्या एफआरपीची रक्कम अर्धवट दिलेल्या कारखान्यात ३१ ऑगस्टच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील पांडुरंग (माळशिरस), श्री सिद्धेश्वर (सोलापूर), संत दामाजी (मंगळवेढा), श्री विठ्ठलराव शिंदे (माढा), मकाई (करमाळा), संत कुर्मदास (माढा), दी सासवड माळी शुगर (माळशिरस), विठ्ठल कॅार्पोरेशन (माढा), इंद्रेश्वर शुगर (बार्शी), युटोपियन शुगर (मंगळवेढा), सहकार शिरोमणी (पंढरपूर), मातोश्री शुगर (अक्कलकोट), भीमा शुगर (मोहोळ), धाराशिव युनिट चार (सांगोला) आणि शंकर साखर कारखाना (माळशिरस) या प्रमुख कारखान्यांसह १८ कारखान्यांचा समावेश आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Sugar #mills #ready #set #fire #Dhurade #Solapur #owes #203crores #previous #FRP, #धुराडे #पेटवणे #साखर #कारखाने #सज्ज #एफआरपी #२०३कोटी #थकित #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव मंगळवेढ्याच्या महाविद्यालयात होणार!
Next Article जुन्या वादातून पोलीस हेडक्वार्टरमध्ये घुसून पोलिसाचा खून

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?