Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वडाळ्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

वडाळ्यात कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून चालकाचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/08/23 at 10:26 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर – दुचाकी वरून जाताना कुत्रा आडवा आल्याने घसरून झालेल्या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावले. ही घटना वडाळा (ता.उत्तर सोलापूर) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. The driver died after the two-wheeler fell due to a dog in Wadala

Contents
□ स्पीडब्रेकर वर दुचाकी उडाल्याने दुचाकी पाठीमागील विवाहितेचा मृत्यूस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ बाणेगाव येथे विवाहितेची आत्महत्या□ लक्ष्मी मार्केट येथे तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

 

गणेश बापू जाधव (वय ५५ रा. वडाळा) असे मयताचे नाव आहे. ते सोमवारी (ता.22) सायंकाळच्या सुमारास घरातून गावातील पेट्रोल पंपाकडे निघाले होते. वाटेत कुत्रा आडवा आल्याने ते दुचाकीवरून घसरून खाली पडून जखमी झाले होते. त्यांना वडाळा येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मरण पावले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ स्पीडब्रेकर वर दुचाकी उडाल्याने दुचाकी पाठीमागील विवाहितेचा मृत्यू

सोलापूर – पतीसोबत दुचाकीच्या पाठीमागे बसून घराकडे जात असताना स्पीडब्रेकर वर दुचाकी आदळून खाली कोसळल्याने संगीता किरण गजघाटे (वय २१ रा. रानमसले ता.उत्तर सोलापूर) ही विवाहिता गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावली. हा अपघात आज मंगळवारी (ता. 23) दुपारच्या सुमारास अकोलेकाटी येथे घडला.

संकिता गजघाटे या पती किरण यांच्या दुचाकीच्या पाठीमागे बसून दुपारी एक वाजेच्या सुमारास कारंबा येथून आपल्या घराकडे निघाल्या होत्या. अकोलेकाटी येथील स्पीड ब्रेकरवर दुचाकी उडाल्याने त्या पाठीमागे तोल जाऊन खाली कोसळल्या.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

डोकीस मार लागल्याने त्यांना बिबीदारफळ त्यानंतर खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांना बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्या उपचारापूर्वीच मयत झाल्या. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

□ बाणेगाव येथे विवाहितेची आत्महत्या

बाणेगाव (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या अश्विनी पप्पू थोरात (वय २८) या विवाहितेने राहत्या घरात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास तिने स्वयंपाक घरातील छताच्या लोखंडी हुकाला दोरीत गळफास घेतली होती. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार पाटील पुढील तपास करीत आहेत.

 

□ लक्ष्मी मार्केट येथे तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

लक्ष्मी मार्केट येथील गुलाम पैलवान यांच्या भंगार दुकानासमोर बसला असताना तीक्ष्ण शस्त्र आणि रॉडने केलेल्या मारहाणीत अक्रम कय्युम सातखेड (वय ३० रा.मुल्लाबाबा टेकडी, सिद्धेश्वरपेठ) हा जखमी झाला.

तो आज मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भंगार दुकानासमोर बसला होता. त्यावेळी अश्रू उर्फ टिपू मुनाफ बागवान, सोहेल शरीफ शेख आणि त्याच्या साथीदाराने अज्ञात कारणावरून मारहाण केली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णांना दाखल करण्यात आले. फौजदार चावडी पोलिसात याची नोंद झाली आहे.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #driver #died #two-wheeler #fell #dog #Wadala #accident #solapur, #वडाळा #सोलापूर #कुत्रा #आडवा #दुचाकी #घसरून #चालक #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भोंग्यानंतर मनसेचा पुढचा लढा : ‘नो टू हलाल’ मोहीम
Next Article महापालिका निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात

Latest News

सांगलीच्या जयश्री पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपा प्रवेश
महाराष्ट्र June 18, 2025
पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?