Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Diesel rate and farmer डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना, शेतकरी हवालदिल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

Diesel rate and farmer डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना, शेतकरी हवालदिल

Surajya Digital
Last updated: 2022/05/08 at 10:43 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने आता शेतीच्या मशागतीच्या किंमतीही वाढल्या आहेत. यामुळे याचा जास्त फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील 2 महिन्यात डिझेलमध्ये प्रति लिटरमागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या डिझेल 105 रूपये प्रति लिटर आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दर वाढीमुळे शेतकऱ्यांचे शेतीचे बजेट कोलमडत आहे. Diesel rate and farmer Diesel price hike hits farmers hardest

पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यानंतर केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे राज्यात सरासरी डिझेलचे दर १०५ रुपयांच्या आसपास आहेत.

डिझेलच्या दर वाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. दरम्यान डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. आधीच शेतकऱ्याला अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत असताना शेतीच्या मशागतीचे दर वाढल्याने मोठा फटका बसला आहे. डिझेलच्या दरात गेल्‍या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.

https://www.facebook.com/109399567404448/posts/536297981381269/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

या दरवाढीचा परिणाम शेतीवर मोठया प्रमाणात हाेत आहे. मशागतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. ट्रॅक्टरने करण्यात येणाऱ्या मशागतीच्या खर्चात जवळपास २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्‍यामुळे इंधन दरवाढीचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच ट्रॅक्टरमुळे तीन दिवसांची कामे आता एका दिवसात होत असली तरी इंधन दरवाढीमुळे उत्पन्न आणि खर्चाचे बजेट कोलमडत चालले आहे.

वेळेची आणि पैशाची बचत करण्यासाठी सध्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. नांगर करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठीही भाव वाढले आहेत. याचा सर्वाधिक शेतकऱ्यांना फटका बसता आहे. आता बहुतांश भागात बैलाने मशागत करण्याचे काम थांबले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने शेतीची कामे केली जातात. नांगरणी, रोटावेटर मारणे, कुरी मारणे, सरी सोडणे, ही कामे करण्यापासून ते पालाकुट्टी करण्यासाठी टॅक्टरचा सर्रास वापर केला जात आहे.

 

दरम्यान इंधन दरवाढीमुळे ट्रक्टरने होण्याऱ्या शेतातील सर्व कामांचे दर वाढविले आहेत. तसेच गावानुसार मशागतीचे दर वेगवेगळे असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक झळ सोसावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित दर मिळत नाही. त्यात या इंधनवाढीमुळे वाहतूक खर्चिक झाली आहे. मागच्या वर्षी एकरी 10 हजार येणारा खर्च आता 20 हजारांच्या घरात जात आहे. शेतीसाठी उत्पादन खर्च मालाला मिळणारा बाजारभाव व इतर खर्च आवाक्याच्या बाहेर चालला आहे.

https://www.facebook.com/109399567404448/posts/536250394719361/

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Diesel #rate #farmer #price #hike #hits #farmers #hardest, #डिझेल #दरवाढी #सर्वाधिक #फटका #शेतकऱ्यांना #शेतकरी #हवालदिल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कामतीत उन्हामुळे लागली आग; रोडच्या कडेचे टेम्पो पेटले
Next Article ‘माझ्या बायकोच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी खून करत राहणार’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?