Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला मिळाली मुदतवाढ; ४ सप्टेंबरपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनला मिळाली मुदतवाढ; ४ सप्टेंबरपर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन

Surajya Digital
Last updated: 2020/08/25 at 10:33 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर:  कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी  विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन  करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या दहावी नंतरच्या  डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन साठी मुदत वाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता दिनांक ४ सप्टेंबर २०२० अखेर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज डीटीईच्या वेबसाईटवरून भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन  करण्याची मुदत २५ ऑगस्ट पर्यंतच दिली होती. त्यात आता वाढ झाली असून विद्यार्थ्यांना ४ सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने इंजिनीअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावरती दिनांक ७ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दिनांक ८ ते १० सप्टेंबर या दरम्यान करता येईल. यानंतर १० सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर पाहता येईल. दिनांक २५ ऑगस्ट ते ४  सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

*  डिप्लोमा प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एस. एस. गायकवाड- मोबा.क्र.९८९०५६६२८१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #डिपलोमा #रजिस्ट्रेशन #मुदतवाढ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वांगरवाडीतील बालकाच्या खूनाची झाली उकल; किरकिर करतो म्हणून मुलाचा निर्दयी आईनेच आवळला गळा
Next Article दिल्ली ते लंडन बससेवेची घोषणा; 15 लाखात 70 दिवसात घडणार 18 देशांमधून प्रवास

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?