Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न थेट विधिमंडळात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न थेट विधिमंडळात

Surajya Digital
Last updated: 2022/08/28 at 10:14 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ सुभाष देशमुख यांची शासनाकडे मागणी : हद्दवाढ विकास समितीच्या मागणीची दखल

 

Contents
□ सुभाष देशमुख यांची शासनाकडे मागणी : हद्दवाढ विकास समितीच्या मागणीची दखलस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ लवकरच तोडगा निघण्याची आशा■ एक लाख सह्यांचे निवेदन

सोलापूर : शहरातील लाखो नागरिकांची समस्या असलेल्या गुंठेवारीचा जटील प्रश्न सुभाष देशमुख यांनी गुरुवारी विधिमंडळात मांडला. हा प्रश्न सोडवण्यासाठी हदवाढ विकास समितीने वारंवार केलेल्या मागणीची दखल आमदार सुभाष देशमुख यांनी आज रविवारी विधिमंडळात घेतली. Gunthewari purchase and sale issue in Solapur city directly in Legislature Subhash Deshmukh demarcation part

 

सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या हद्दवाढ भागामध्ये गुंठेवारी खरेदी विक्री बंद आहे. परिणामी, लाखो नागरिकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. अनेकांना अडचणीच्या वेळी आर्थिक तरतूद करण्यास यामुळे अडथळा येत आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री त्वरित सुरू करावी, अशी मागणी हद्दवाढ विकास समितीच्या माध्यमातून अध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी वारंवार केली आहे. यासाठी एक लाख नागरिकांच्या सह्यादेखील हद्दवाढ विकास समितीतर्फे घेण्यात आल्या आहेत.

सोलापूर शहराचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास १९७५ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून २००१ पर्यंत गुंठेवारी अंतर्गत प्लॉट विक्री खरेदी चालू होती. शासन नियमानुसार २००१ साली गुंठेवारी बांधकाम परवानगी बंद करण्यात आली. यानंतरचे बांधकाम परवाने टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देऊन देण्यात आलेले असले तरीही २००१ नंतर गुंठेवारी खरेदी विक्री चालू होती, मागील एक वर्षापासून बंदच आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शहराच्या हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानगी, एन. ए. करून, बँकेचे कर्ज काढून बांधकाम केलेली घरे लाखोंच्या संख्येने आहेत. त्यामुळे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात असलेल्या गुंठेवारी वसाहती आता बेकायदेशीर ठरवणे अयोग्य आहे. अनेकांना आर्थिक अडचणीमुळे घराची विक्री करण्याची गरज भासते. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्न समारंभ, वैद्यकीय अशा अनेक अडचणीच्या वेळी आपले घर, प्लॉटची विक्री करावी लागते. मात्र गेल्या एका वर्षापासून गुंठेवारी बंद असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी प्रचंड वाढत आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करणे अत्यंत गरजेचे बनले आहे, असे आ. सुभाष देशमुख म्हणाले.

 

 

सोलापूर शहराच्या चारही बाजूंना असलेल्या हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर, देगाव, शेळगी, केगाव, सोरेगाव गावठाण, बाळे, रचना सोसायटी, प्रसाद नगर, मीरा नगर, रोहिणी नगर, आर्य चाणक्य नगर, स्वामी विवेकानंद नगर, सुभाष नगर, नीलम नगर, स्वागत नगर, केंगनाळकर नगर, सिद्धेश्वर नगर, म्हेत्रे वस्ती, शिवगंगा नगर, आदर्श नगर, हत्तुरे वस्ती, सुभाष नगर, अनिता नगर अशा अनेक परिसरातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. या भागात लाखो गोरगरीब नागरिकांचे पुर्वीपासुन वास्तव्य आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंठेवारीमध्ये बांधकाम परवाना घेऊन घरे बांधली आहेत. मात्र आता बांधकाम परवानगी मिळत नाही आणि या घरांची विक्रीही होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही आ. देशमुख यांनी शासनाकडे केली.

□ लवकरच तोडगा निघण्याची आशा

 

सोलापूर शहराच्या चारही बाजूला असलेल्या हद्दवाढ भागातील लाखो नागरिकांचा अत्यंत महत्त्वाचा गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न आ.सुभाष देशमुख यांनी विधीमंडळात मांडून या समस्येला वाचा फोडली आहे. या प्रश्नावर शासन स्तरावरून लवकरच तोडगा निघेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

–  संतोष केंगनाळकर, अध्यक्ष हद्दवाढ विकास समिती, सोलापूर

 

■ एक लाख सह्यांचे निवेदन

 

– सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री पुन्हा सुरु व्हावी यासाठी हद्दवाढ विकास समितीनं १ लाख सह्यांची मोहीम पुर्ण केली असून त्या सह निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्या सोमवारी मुंबईत देण्यात येणार आहे.

उपनगरात हा प्रश्न मोठा आहे. शासनाचं याकडे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहिम घेण्यात आली होती. पत्रकार परिषदेस संतोष केंगनाळकर, आनंद बुक्कानुवरे, काशिनाथ भतगुणकी, सुधाकर व्हनमाने, मनोज अलक्कुटे, सचिन चौगुले, विठ्ठल सावळगी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Gunthewari #purchase #sale #issue #Solapurcity #directly #Legislature #SubhashDeshmukh #demarcationpart, #सोलापूर #शहर #गुंठेवारी #खरेदी #विक्री #प्रश्न #थेट #विधिमंडळ #सुभाषदेशमुख #हद्दवाढभाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात रेल्वेवर चढून सेल्फी घेताना युवक जखमी, रेल्वे पोलिसांची तत्परता
Next Article राणी लक्ष्मीबाई मंडईतील 192 ओट्यांचा उद्या होणार लिलाव !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?