Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑपरेशन सिंदूर’च्या पोस्टरच्या टिकेनंतर दिग्दर्शकाने मागितलली माफी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

ऑपरेशन सिंदूर’च्या पोस्टरच्या टिकेनंतर दिग्दर्शकाने मागितलली माफी

admin
Last updated: 2025/05/11 at 4:37 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 11 मे (हिं.स.)।भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यानंतर सगळीकडे भारतीय सैन्याचं कौतुक झालं. सैन्याच्या कामगिरीने सर्वांचीच मान अभिमानाने उंचावली.या ‘ऑपरेशन सिंदूर’वर सिनेमा बनवण्यासाठी मेकर्समध्ये चढाओढ सुरु झाली. काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन सिंदूर’ सिनेमाची घोषणाही करण्यात आली. याचं पोस्टर समोर येताच नेटकरी चांगलेच भडकले. लोकांनी फिल्ममेकर्सच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले. यानंतर आता सिनेमाच्या दिग्दर्शकाने सर्वांची माफी मागितली आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ सिनेमाचं पोस्टरवर विरोध वाढत असतानाच आता दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिले, “मी भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रेरित होऊन त्यावर सिनेमाची घोषणा केली त्यासाठी माफी मागतो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. एक फिल्ममेकर म्हणून भारतीय सैन्याची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर यावी असं मला वाटलं. भारतीय सैन्यावरील आपलं प्रेम आणि आदर या भावनेतूनच सिनेमाची घोषणा केली. पैसा आणि प्रसिद्धी हा त्यामागचा हेतू नव्हता.”

मी समजू शकतो की अशा प्रसंगी सिनेमाची घोषणा केल्याने अनेक लोक नाराज आहेत. म्हणूनच मी माफी मागतो. हा फक्त सिनेमा नाही तर संपूर्ण देशाची भावना आहे. आपल्या आर्मीने आणि पंतप्रधान मोदींनी सर्वांना गर्व वाटेल असं काम केलं आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’ सिनेमाचं पोस्टर शुक्रवारी, ९ मे रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं. उत्तम माहेश्वरी सिनेमा दिग्दर्शित करणार असून विकी भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनिअर याची निर्मिती करणार आहेत. पोस्टर समोर येताच याला चांगलाच विरोध झाला. देश इतक्या गंभीर स्थितीतून जात असताना यावर सिनेमा बनवणं खूप असंवेदनशील आहे अशा प्रतिक्रिया आल्या. तसंच हे पोस्टर ए आय जनरेटेड असल्याचं बोललं गेलं.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी
Next Article सरकार स्थापन झाल्यापासून आरोग्य यंत्रणा ठप्प – प्रणिती शिंदे

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?