Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आमदार संतोष बांगरांच्या चेल्यांची पंढरपुरात झुंडशाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

आमदार संतोष बांगरांच्या चेल्यांची पंढरपुरात झुंडशाही

Surajya Digital
Last updated: 2022/11/21 at 1:26 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ गार्डला बदडले, शुटिंगचे मोबाईलही फोडले□ झिंगलेल्या अवस्थेत आले, मारहाण करुन गेले• पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मातब्बर, तगडे व नेहमीच वादग्रस्त ठरलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरला आल्यानंतर विश्रामगृहातील रुम देण्याच्या कारणावरून तिथल्या गार्डला बेदम मारहाण केली. शनिवारी (ता. 19) रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. झिंगलेल्या अवस्थेत मारहाण करून मोबाइल फोडले, गार्डला बदडले. MLA Santosh Bangar’s disciples were beaten up by a mob in Pandharpur and their mobile phones were brokenस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● आमदारही भडकले…● चक्क पोलिसालाच शिवीगाळ

□ गार्डला बदडले, शुटिंगचे मोबाईलही फोडले

□ झिंगलेल्या अवस्थेत आले, मारहाण करुन गेले

• पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मातब्बर, तगडे व नेहमीच वादग्रस्त ठरलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरला आल्यानंतर विश्रामगृहातील रुम देण्याच्या कारणावरून तिथल्या गार्डला बेदम मारहाण केली. शनिवारी (ता. 19) रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. झिंगलेल्या अवस्थेत मारहाण करून मोबाइल फोडले, गार्डला बदडले. MLA Santosh Bangar’s disciples were beaten up by a mob in Pandharpur and their mobile phones were broken

या मारहाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे सौरभ कदम यांना मुका मार लागला आहे. मारहाणीचे चित्रीकरण करताना या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत त्यांचा मोबाईलही फोडून टाकला. आमदार नसताना त्यांचे चेले कशी झुंडशाही करतात ? सोबत आमदार असतील तर त्यांचा ‘प्रताप’ काय असू शकेल ? असा संतापजनक प्रश्न पंढरपूकरांमधून उपस्थित केला जात आहे.

झाले असे की- शिंदे सरकारमधील एक मंत्री डॉ. सुरेश खाडे हे दर्शनासाठी रविवारी पंढरपूरला आले होते. त्यासाठी शनिवारीच विश्रामगृहातील खोल्या बुक झाल्या होत्या. कदम हे नेहमी प्रमाणे आपली सेवा बजावत असताना एका कारमधून पाचजण विश्रामगृहावर आले. त्यांनी कदमांकडे रुम देण्याची मागणी केली. कदम यांनी बुकिंग केले आहे का? अशी विचारणा केली. बुकिंग केल्याशिवाय रुम दिली जात नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या कार्यकर्त्यांनी कदम यांना दमबाजी सुरु केली.

आम्ही आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्ते आहोत, असे म्हणत रुम उघडून देण्यासाठी दबाव आणू लागले. दरम्यान त्यातील एकाने आमदार बांगर यांना फोन लावून रुम देत नसल्याची तक्रार केली. सारेजण चिडून कदम यांना मारहाण करायला सुरूवात केली. कदम यांनी मारहाणीचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केल्यानंतर हे कार्यकर्ते अजून भडकले. शुटिंग करतोय काय म्हणत कदम यांना परत मारहाण करून शिवीगाळही केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● आमदारही भडकले…

मारहाण करून हे कार्यकर्ते थांबले नाहीत तर आ. बांगर यांच्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यानंतर खुद्द बांगर यांनी मोबाईलवरुन त्या सुरक्षा रक्षकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन रुम उघडून देण्यासाठी दमबाजी केली. आमदारांनी दमबाजी करुन देखील रुम देत नसल्याने कार्यकर्त्यांनी त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. मारहाण करणारे झिंगलेल्या अवस्थेत होते, असे हा प्रकार पाहिलेल्यांनी सांगितले.

आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी कदम यांना बेदम मारहाण करुन पळ काढला. सदरची घटना रात्री उशिरा घडल्याने कदम यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली नाही मात्र घडलेली घटना पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्या कानावर घातली. पोलीस कारवाई बाबत गावडे हे वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे समजते.

● चक्क पोलिसालाच शिवीगाळ

 

‘मातोश्री’ चे निष्ठावंत असणारे संतोष बांगर हे सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर त्यांची एक एक वागणूक गेल्या दोन महिन्यात वादग्रस्त ठरत आहे. मंत्रालयात कार्यकर्त्यांना अडवल्याबद्दल बांगर यांनी चक्क पोलिसालाच शिवीगाळ केली. तू मला काय शिकवतो का ? अशी भाषा त्यांनी वापरली. हा प्रकार ४ नोव्हेंबरला घडला. त्यानंतर पोलीस दलाने बांगर यांच्याविषयीचा एक अहवाल सरकारकडे पाठवला आहे. बांगर यांनी ज्या पोलिसाला शिवीगाळ केली, तो माजी सैनिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बांगर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असताना अजूनही त्यांच्याकडून व त्यांच्या चेल्यांकडून झुंडशाहीचे प्रकार सुरू व्हावेत, ही राज्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #MLA #SantoshBangar's #disciples #beaten #mobile #Pandharpur #mobilephones #broken, #आमदार #संतोषबांगर #चेले #पंढरपूर #झुंडशाही #मारहाण #गार्ड #झिंगणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या; नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान’
Next Article बार्शी । ही तर झेडपीची रंगीत तालिमच; कापसे आणि डिसलेंच्या राजकारणात तिस-याची एंट्री

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्र July 15, 2025
टेस्लाचे स्मार्ट एसयूव्ही मॉडेल Y भारतात लाँच; किंमत ५९. ८९ लाखांपासून सुरू
देश - विदेश July 15, 2025
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार – प्रताप सरनाईक
देश - विदेश July 15, 2025
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
देश - विदेश July 15, 2025
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी १ ऑगस्टपासून मुंबईत धावणार
महाराष्ट्र July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?