Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप – मनसे युती होणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

भाजप – मनसे युती होणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Surajya Digital
Last updated: 2022/04/04 at 12:36 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ नितीन गडकरी यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रविवारी भेट घेतली. त्यामुळे भाजप मनसे युती होणार, अशा चर्चांना उधाण आले. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबद्दल माहिती दिली. ‘भाजप मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही’, असं त्यांनी ट्विट केलं. तसेच यावरून त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला डिवचलं.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट राजकीय आहे की वैयक्तिक हे अद्याप स्पष्ट नाही. पण या भेटीने राजकीय चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

नवी मुंबईतील जेएनपीटीचा कार्यक्रम आटोपून मुंबईतील निवासस्थानी परतताना गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. आगामी मुंबई महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्व नियोजित कार्यक्रम नसताना अचानक झालेल्या या भेटीने राजकीय चर्चाना सुरूवात झाली. ही सदिच्छा भेट खासगी स्वरूपाची होती, असे सूत्रांनी सांगितले. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. पण आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असून मनसेशी युती करणार नाही, असे भाजपने जाहीर केल्याने गडकरी-ठाकरे भेटीतून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

Will there be BJP-MNS alliance? Discussions abound in political circles

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला सॉफ्ट कॉर्नर ठेवत महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास  आघाडीवर हल्लाबोल केला. भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत राज यांच्या भाषणाचे कौतुक केले. अशातच भाजपचे नेते गडकरी राज यांच्या मुंबईतील निवासस्थानी रात्री १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि मनसे युतीची चर्चा सुरू आहे.

राज हे नवीन घरी शिफ्ट झाले आहेत. राज यांनी गडकरी यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. यानुसार गडकरी राज यांच्याकडे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, गडकरी आणि ठाकरे यांच्या भेटीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्याने हिंदुत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवरून आमिषे दाखवून समाजात फूट पाडण्यात आली, असा घणाघात राज यांनी केला होता.

राज ठाकरे यांनी या भेटीबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र नितीन गडकरी यांनी ही भेट राजकीय नाही. गेली ३० वर्षे राज ठाकरे यांच्या कुटुंबाबरोबर आमचे घरोब्याचे संबंध आहेत. त्यांनी नवे घर बघायला बोलावले होते त्यामुळे घर बघायला आणि राज ठाकरे यांच्या मातोश्रीच्या भेटीसाठी ठाकरे यांच्या घरी गेल्याचे सांगितले. ठाकरे यांच्या घरातील गडकरी यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध केले गेले आहेत.

शिवतीर्थावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी आपला कुठल्याही प्रार्थनेला, धर्माला विरोध नाही पण माझ्या धर्माचा अभिमान आहे असे सांगितले होते आणि राष्ट्रावार्दी कॉंग्रेस प्रमुख शरद पवार जाती धर्मावरून समाजात फुट पाडत आले आहेत अशी टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमित शहा आणि मोदी यांनी फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील हे सांगितल्याचे चांगलेच ठाऊक होते पण निवडणूक निकालानंतर भाजप स्वबळावर सरकार बनवू शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा पवित्रा घेतल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

You Might Also Like

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या

नियोजनाच्या अभावामुळे माळेगावची मतमोजणी चालली 36 तास

‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का

TAGGED: #BJP #MNS #alliance #Discussions #abound #political #circles, #भाजप #मनसे #युती #राजकीय #वर्तुळात #चर्चा #उधाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा
Next Article 500 कोटींचा घोटाळा, शिवसेनेच्या तक्रारीवर सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्याची ED चौकशी

Latest News

crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार
देश - विदेश June 26, 2025
उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
देश - विदेश June 26, 2025
मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी
देश - विदेश June 26, 2025
अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
महाराष्ट्र June 26, 2025
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?