Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सार्वजनिक आरोग्य अभियंता धनशेट्टी यांना तडकाफडकी केले कार्यमुक्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सार्वजनिक आरोग्य अभियंता धनशेट्टी यांना तडकाफडकी केले कार्यमुक्त

Surajya Digital
Last updated: 2023/01/29 at 9:15 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ प्रशासकीय व राजकीय वर्तुळात उलट – सुलट चर्चेला आले उधाण

□ महापालिका आयुक्तांचा खळबळजनक आदेश !

 

Contents
□ प्रशासकीय व राजकीय वर्तुळात उलट – सुलट चर्चेला आले उधाण□ महापालिका आयुक्तांचा खळबळजनक आदेश !स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 तत्कालीन सीईओ ढेंगळे – पाटील यांच्या नंतर आरोग्य अभियंता धनशेट्टी कार्यमुक्त !¤ अशी आहे अभियंता धनशेट्टी यांची कारकीर्द

सोलापूर : महापालिकेतील आवेक्षक व सहाय्यक अभियंत्यांचे खांदेपालट करतानाच महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्याचा आदेश महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. Public Health Engineer Dhanshetty has been dismissed from work discussion order Solapur Municipal Corporation

 

आरोग्य अभियंता पदाचा पदभार कुणाला द्यायचा हे स्पष्ट न केल्याने महत्त्वाचे हे पद तूर्तास तरी रिक्त झाले आहे. दुहेरी जलवाहिनीचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले असतानाच कार्यमुक्तीच्या या निर्णयामुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात उलट – सुलट चर्चेला उधाण आले आहे.

 

महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता हे पद पाणीपुरवठा व ड्रेनेज व्यवस्थेची निगडित आहे. महापालिकेचा हा विभाग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांना शासनाने महापालिकेत या पदासाठी मुदतवाढ दिली नाही. यामुळे काल महापालिका आयुक्त शितल तेली- उगले यांनी धनशेट्टी यांना सार्वजनिक आरोग्य अभियंता व तांत्रिक अधिकारी पदावरून कार्यमुक्त केल्याचे आदेश काढले आहेत. हे आदेश काढत असतानाच ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर हा बदल केला आहे.

या आरोग्य अभियंता पदाचा चार्ज कुणाकडे द्यायचा आहे ? या आदेशात नमूद केलं नाही. यामुळे हे महत्त्वाचे पद तूर्तास तरी रिक्त असल्याचे मानले जात आहे. पर्यायी व्यवस्था कुणाकडे सोपविणार ? याकडे आता लक्ष लागले आहे.

 

काल महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी महापालिकेतील पाच आवश्यक आणि चार सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या केल्या. त्याचबरोबर आरोग्य अभियंता पदावर कार्यरत असलेले संजय धनशेट्टी यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले. यामुळे महापालिका प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील अभियंता माशाळे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 तत्कालीन सीईओ ढेंगळे – पाटील यांच्या नंतर आरोग्य अभियंता धनशेट्टी कार्यमुक्त !

 

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे – पाटील यांना शासनाने 25 नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त केले होते. तत्पूर्वी एक दिवस अगोदर ढेंगळे – पाटील यांनी उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम थांबवण्याचे आदेश संबंधित लक्ष्मी कंपनीस दिले होते. त्यातच जुन्या पोचमपाड कंपनीने प्रस्ताव देऊन एन्ट्री केली. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. ढेंगळे – पाटील यांना नोटीस बजावण्याचे आदेशही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

त्यानंतर आता सोलापूर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांना महापालिका आयुक्तांनी तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समांतर जलवाहिनी व स्काडा प्रणालीसह पाणीपुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात येत असतानाच ही कार्यमुक्ती धक्कादायक मानली जात आहे. यामुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात उलट – सुलट चर्चेला उधाण आले आहे.

शासनाने मुदतवाढ दिली नसल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. परंतु तीन महिने अगोदर महापालिका प्रशासनाकडून शासनाला संबंधित अधिकारी यांची मुदत संपली असल्याचे कळविणे आवश्यक आहे. तसे न कळविता परस्पर कार्यमुक्त करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

¤ अशी आहे अभियंता धनशेट्टी यांची कारकीर्द

 

संजय धनशेट्टी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील अभियंता संजय धनशेट्टी हे सन 2016 मध्ये सोलापूर महापालिकेत आरोग्य अभियंता विभागाकडे दाखल झाले. त्यानंतर ऑगस्ट 2019 रोजी त्यांनी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा पदभार घेतला. महापालिकेत सात वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पाहिला. या काळात पाणीपुरवठा व ड्रेनेज योजनेची महत्त्वपूर्ण कामे त्यांनी केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा महापालिका प्रशासनाला झाला. अमृत योजनेची कामेही त्यांनी जबाबदारीने पार पाडली.

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #PublicHealthEngineer #Dhanshetty #phe #dismissed #work #discussion #order #Solapur #MunicipalCorporation, #सोलापूर #महापालिका #सार्वजनिकआरोग्यअभियंता #पीएचई #संजयधनशेट्टी #तडकाफडकी #कार्यमुक्त #चर्चा #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article antelope सोलापुरात 14 काळविटांचा दुर्दैवी मृत्यू; पूर्वीही झाला होता अपघात
Next Article Ujani dam burst उजनी धरणाचा उजवा कालवा फुटला, शेतीचे नुकसान

Latest News

भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध थांबले नसते तर पुढे अण्वस्त्र युद्ध झालं असतं – डोनाल्ड ट्रम्प
देश - विदेश July 15, 2025
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा पुढे ढकलली
देश - विदेश July 15, 2025
पहलगाम हल्ला : आयएसआय व लश्कर-ए-तोयबाचा कट
देश - विदेश July 15, 2025
मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी
महाराष्ट्र July 15, 2025
टेस्लाचे स्मार्ट एसयूव्ही मॉडेल Y भारतात लाँच; किंमत ५९. ८९ लाखांपासून सुरू
देश - विदेश July 15, 2025
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार – प्रताप सरनाईक
देश - विदेश July 15, 2025
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी घेतली चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट
देश - विदेश July 15, 2025
देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी १ ऑगस्टपासून मुंबईत धावणार
महाराष्ट्र July 15, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?