Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बँक अध्यक्ष बच्चू कडूंची अपात्रता, हायकोर्टात 24 जूनला सुनावणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

बँक अध्यक्ष बच्चू कडूंची अपात्रता, हायकोर्टात 24 जूनला सुनावणी

admin
Last updated: 2025/06/20 at 5:11 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 20 जून (हिं.स.)

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एडीसीसी) अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या संचालक आणि अध्यक्षपदाच्या अपात्रेबाबतच्या याचिकेची सुनावणी आता मंगळवार, २४ जून रोजी होणार आहे. या प्रकरणातील प्रतिपक्षाने आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितल्यामुळे मंगळवारी नेमके काय होणार, याकडे सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.

एडीसीसीचे संचालक हरिभाऊ मोहोड व इतर ११ संचालकांनी बच्चू कडू हे संचालक व अध्यक्षपदासाठी पात्र ठरत नसल्याची तक्रार विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली होती. कडू यांना नाशिकच्या न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सन २०१७ सालचे हे प्रकरण आहे. त्यामुळे बँकेच्या उपविधीनुसार ते संचालक आणि पर्यायाने अध्यक्षपदासाठी अपात्र ठरतात, असा तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद होता. ही बाब ग्राह्य धरुन विभागीय सहनिबंधक यांच्या न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन्ही पदांसाठी अपात्र ठरविले. अपात्रतेबाबतचा हा निर्णय गेल्या सोमवारी सार्वजनिकरीत्या समोर आला.

त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी बच्चू कडू यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती पानसरे यांच्या एकलपीठासमोर आज, गुरुवारी या याचिकेची सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान प्रतिपक्षाने दोन दिवसांचा अवधी मागितला. मुळात या प्रकरणात प्रतिपक्षानेही मंगळवारीच ‘कॅव्हेट’ दाखल केलेला असल्याने न्यायमूर्तींनी अवधी मागण्याचा त्यांचा मुद्दा ग्राह्य धरत पुढील सुनावणी २४ जून रोजी निश्चित केली. बच्चू कडू यांच्या वतीने या प्रकरणात ॲड. पराग कडू युक्तीवाद करणार आहेत. तर प्रतिपक्षाची बाजू मांडण्याचे काम ॲड. निलेश गावंडे करीत आहेत.

You Might Also Like

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

विरोधकांनी आपल्या पॅनेलचे चेअरमन जाहीर करावेत – अजित पवार

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

दिग्विजय सिंह यांच्या भावाची काँग्रेसमधून गच्छंती

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article खामेनी यांचे अस्तित्व संपवून टाकण्याचा इस्रायलचा लष्कराला आदेश
Next Article वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे ‘वारीवीर’च  – चंद्रकांत पाटील

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?