Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शटडाऊन | शेळगी व विडी घरकुल भागातील पाणीपुरवठा होणार विस्कळीत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शटडाऊन | शेळगी व विडी घरकुल भागातील पाणीपुरवठा होणार विस्कळीत

Surajya Digital
Last updated: 2023/04/03 at 7:49 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 33 केव्ही सोलापूर सर्किट एक आणि दोन मेंटेनन्स कामाकरिता दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत शटडाऊन घेण्यात येणार आहे.  shutdown | Water supply will be disrupted in Shelgi and Vidi Gharkul areas BSNL divisional office dues यामुळे भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र येतील वीजपुरवठा खंडित होणार असल्याने शेळगी व विडी घरकुल परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली.

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)○ थकबाकी भरल्याशिवाय बीएसएनएल, कार्यालयाचे सील काढण्यात येणार नाही

 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 33 केव्ही सोलापूर सर्किट एक आणि दोन मेंटेनन्स कामाकरिता दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र येथील पंप हाउस करिता 11 केव्ही भवानी पेठ सबस्टेशनहून येणारी 11 केव्ही लाईन बंद होणार आहे. त्यामुळे विडी घरकुल आणि शेळगी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

 

त्यामुळे दि. 5 एप्रिल रोजी शेळगी, विडी घरकुल येथील व आजूबाजूच्या परिसरात भागातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ आणि कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

○ थकबाकी भरल्याशिवाय बीएसएनएल, कार्यालयाचे सील काढण्यात येणार नाही

 

▪︎ उपायुक्त विद्या पोळ यांचे स्पष्टीकरण !

सोलापूर : बीएसएनएलने थकबाकी भरल्याशिवाय होटगी रोडवरील सब डिव्हिजन कार्यालयाचे सील काढण्यात येणार नाही. त्यांनी घेतलेल्या हरकतीला कायदेशीर आधार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी दिले.

 

सोलापूर महापालिका मिळकत कर वसुली पथकाकडून मंगळवारी ( दि. 28 मार्च) होटगी रोडवरील बीएसएनएलचे सब डिव्हिजन कार्यालय 75 लाख 67 हजार 553 रुपयाच्या मिळकत कर थकबाकीपोटी सील करण्यात आले. तसेच येथील पाण्याचे 2 नळही बंद करण्याची कारवाई केली आहे. त्यानंतर बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांनी थेट महापालिकेत धाव घेऊन मिळकत कराची आकारणी अधिक केल्याचा आक्षेप घेतला होता.

 

दरम्यान या संदर्भात उपायुक्त विद्या पोळ यांना विचारले असता त्यांनी अद्यापही थकबाकी भरली नाही. त्यामुळे सील कायम आहे. चार वर्षाची या बीएसएनएल कार्यालयाकडे थकबाकी आहे. बिल दिल्यानंतर किमान एक महिन्यात हरकत घेणे नियमानुसार आवश्यक आहे. त्यांनी त्यावेळी कोणत्याही प्रकारचे हरकत घेतली नव्हती. त्यांच्या हरकतीला कायदेशीर आधार नाही. यामुळे पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय सील काढण्यात येणार नाही असे उपायुक्त पोळ यांनी सांगितले.

 

ज्या शासकीय कार्यालयांकडे महापालिकेची देणे आहेत, ती देणी वजा करून उर्वरित थकबाकी त्यांच्याकडून जमा करण्यात येणार आहे. थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. बड्या थकबाकीदारांवर कारवाई हाती घेण्यात येत आहे. शासकीय कार्यालयाकडे असलेल्या थकबाकीपोटी प्रथम नळ तोड मोहीम हाती घेण्यात येईल, असेही उपायुक्त पोळ यांनी स्पष्ट केले.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #shutdown #Watersupply #disrupted #Shelgi #VidiGharkul #areas #BSNL #divisional #officedues, #शटडाऊन #शेळगी #विडी #घरकुल #भाग #पाणीपुरवठा #विस्कळीत #बीएसएनएल #विभागीय #कार्यालय #थकबाकी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेस नेते राहुल गांधींना जामीन मंजूर
Next Article पंढरपूर बाजार समिती बिनविरोध होण्याची शक्यता धूसर, 18 जागांसाठी 117 अर्ज

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?