Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छापेमारीमुळे मिळाला अभिजित पाटलांना बुस्टर डोस; विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

छापेमारीमुळे मिळाला अभिजित पाटलांना बुस्टर डोस; विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला

Surajya Digital
Last updated: 2022/09/18 at 6:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□  विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला

 

पंढरपूर/ सुरज सरवदे

राजकारणात कोणती गोष्ट कधी फायद्याची ठरेल सांगता येत नसते. गेल्या आठवड्यात विठ्ठल, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या खाजगी साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. आयकर विभागाकडे अभिजित पाटील यांच्या विरुद्ध १२८ तक्रारी केल्यानंतरही आयकर विभागाला रिकाम्या हाती माघारी जावे लागते होते. Raid gets Abhijit Patel booster dose; Disrupted Vitthal Sakhar became a political union

 

अभिजित पाटील यांच्याकडे अल्पावधीतच ५ खाजगी आणि एक सहकारी साखर कारखाना आहे. भाजप सत्तेत असताना २०१७ साली अभिजित पाटील यांनी उस्मानाबाद येथे पहिली साखर कारखाना विकत घेतला. त्यानंतर २०१८ नाशिक येथील साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला. त्यानंतर २०१९ साली नांदेड येथील साखर कारखाना विकत घेतला. तिन्ही साखर कारखाने व्यवस्थित चालवले. अभिजित पाटलांनी शेतकऱ्यांना वेळेवर बिल, कामगारांच्या पगारी, ऊस तोडणी वाहतूकदारांची वेळेवर दिल्यामुळे देणी वेळेवर शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वास संपादन केला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

दरम्यान महाविकास आघाडी सरकारने २०२१ साली १२ वर्षे बंद असलेला सांगोला सहकारी साखर
कारखाना अभिजित पाटील यांना भाडेतत्त्वावर दिला. शेतकऱ्यांची बिले, कामगारांच्या पगारी देऊन कारखाना चालवला. विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे सांगोला सहकारी
साखर कारखान्याने बहुतांश विठ्ठलच्या सभासदांचा ऊस गाळप केला आणि त्याचवेळी विठ्ठलच्या राजकारणात उडी घेतली. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे उद्ध्वस्त झालेल्या विठ्ठल साखर कारखाना सभासदांनी अभिजित पाटील यांच्या ताब्यात दिला.

विशेष म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे २००७ साली ऊस टोळी मालक असलेले अभिजित पाटील विठ्ठलचे अध्यक्ष झाले. याच दरम्यान बीड येथे सहावा साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतला.

आयकरच्या धाडींचा परिणाम अभिजित पाटील यांच्याबद्दल प्रचंड सहानभूती वाढली आहे. विठ्ठल परिवारातील नेते, कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांना भेटून आपला पाठिंबा दर्शविला आहे. आयकरच्या कारवाई दरम्यान अनेकांनी देव पाण्यात ठेवून अभिजित पाटील यांच्यावरील कारवाई थांबवण्याची प्रार्थना केली होती. आयकरच्या करवाईमध्ये काहीही निष्पन्न न झाल्यामुळे अभिजित पाटील हे सहकारातील, राजकारणातील निष्कलंकित नेतृत्व असल्याचे सिद्ध झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 

□  विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला

 

अभिजित पाटील यांच्यावर आयकरची छापेमारी राजकीय हस्तक्षेपामुळे झाल्याची अंदाज अभिजित पाटील यांनी व्यक्त केला. आयकरच्या छापेमारी काही सापडले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते तर वावगं ठरलं असतं. मात्र छापेमारी अमच्यामुळे सुरू झाली असे सोशल मीडियावर टाकणे विरोधकांना अंगलट आले.

 

याचाच फायदा अभिजित पाटील यांनी घेतला. छापेमारीनंतर अभिजित पाटील यांनी पुन्हा परिचारक यांना थेट अंगावर घेतले. आपल्या नेतृत्वाची धमक दाखवली. त्यामुळे विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला. स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यानंतर विठ्ठल परिवाराला अभिजित पाटील यांच्या रुपात तरुण ताडपदार, धाडसी नेतृत्व मिळाले आहे.

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

TAGGED: #Raid #gets #AbhijitPatil #booster #dose #Disrupted #Vitthal #Sakhar #political #union, #पंढरपूर #छापेमारी #अभिजितपाटील #बुस्टर #डोस #विस्कटलेला #विठ्ठल #कारखाना #एकसंघ #राजकीय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, दिवाळीआधीच लागणार मंत्रीपदाची लॉटरी
Next Article शरद पवारांची एन्ट्री : कधीही न दिसणारे शहराध्यक्ष पोस्टरवर झळकले

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?