सोलापूर, 1 ऑगस्ट।
जनतेच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.
या लोकशाही दिनात—
-
मागील सहा महिन्यातील लोकशाही दिनाच्या निवेदनांवरील कारवाई अहवाल,
-
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अर्ज,
-
तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींवरील कार्यवाही
—यांचा निपटारा करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.