Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Two accidents in Solapur सोलापुरात दोन अपघात; डॉक्टर दाम्पत्यासह आठ ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Two accidents in Solapur सोलापुरात दोन अपघात; डॉक्टर दाम्पत्यासह आठ ठार

Surajya Digital
Last updated: 2022/05/23 at 8:40 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…● सांगोल्यातील अपघातात दोन ठार

सोलापूर / मोहोळ : सोलापुरात आज दोन अपघात झाले असून यात आठजण ठार झाल्याची माहिती आहे. यात डॉक्टर दाम्पत्याचा समावेश असून एका पाचवर्षीय मुलाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. एक अपघात मोहोळ तालुक्यातील पेनूर गावाजवळ तर दुसरा सांगोल्यात झाला. Two accidents in Solapur; Eight killed along with doctor couple Sangola Mohol Penur

मोहोळ- पंढरपूर महामार्गावर पेनूर गावाजवळ आज रविवारी (दि. 22) भीषण अपघात झाला. या अपघातात डाॅक्‍टर दाम्‍पत्‍यासह सहा जण जागीच ठार झाले. नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनूर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात झाला.

सर्व मृत हे मोहोळ शहरातील आहेत. दरम्‍यान, अपघातातील जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. आफरिन अत्तार (वय 30), पती डॉ. मुजाहिद ईमाम अत्तार (वय 35), मुलगा अरमान मुजाहीद आतार (वय 5 ), मेव्हणे इरफान खान, त्यांची पत्नी व त्यात दोन मुलं असे ६ जण जागीच ठार झाले आहेत. कारमधील अनिल हुंडेकरी (वय 35 ) मनीषा मोहोन हुंडेकरी (वय 30 रा. गादेगांव ता.पंढरपूर) अरहान ईरफान खान ( आतार वय 10 रा. मोहोळ)  त्यांना पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी सोलापूरला रवाना केल्याची माहिती आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पंढरपूर – मोहोळ महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण हाेती की, सहाजण जागीच ठार झाले. या अपघातामध्ये मोहोळ शहरातील डॉक्टर पती-पत्नी, मेव्हणे व त्यांची पत्नी तसेच त्यांच्यासह 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

चारपदरी रस्ता झालेला असताना समोरासमोर अपघात कसा झाला, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. डॉ.अत्तार हे पंढरपूरहून मोहोळकडे निघाले होते, तर कारमधील प्रवासी सोलापुरातून लग्न आटपून पंढरपूर येथील गादेगावकडे निघाले होते.

 

अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली
पती डॉक्टर मुजाहिद इमाम आतार व त्यांची पत्नी डॉ. आफ्रीन मुजाहिद आतार हे दोघे डॉक्टर आहेत. या अपघातात त्यांच्यासह  घटनेचे वृत्त समजताच खान व आतार यांच्या नातेवाईकांनी मोहोळ ग्रामीण रुग्णालयासमोर एकच गर्दी केली होती.
मोहोळ पंढरपूर रस्त्यावर पालखी मार्गाचे काम सुरू आहे. पेनूर जवळरस्त्याच्या कामासाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती.  सेरेलो कारही मोहोळकडे येत होती. स्कार्पिओ कार स्पीड मध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात  सेरेलो कारच्या आडवी गेली आणि यामुळे अपघात झाला. स्कार्पीओ गाडी मोठी असल्याने त्याचे फारसे नुकसान झाले नाही तर डॉक्टरांनी फॅमिलीला फिरण्यासाठी मागील चार महिन्यांपूर्वी घेतलेली सेरेलोकार लहान असल्याने त्या गाडीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर घटना स्थळी भयानक दृष्य दिसत होते.
इरफान नुरखान खान हे सॉप्टवेअर इंजिनिअर असून ते स्वतः गाडी चालवत होते तर डॉ आतार व त्यांच्या बाजूस बसले होते. स्कार्पीओची धडक झाल्यानंतर पुढील हे दोघेही दबले. त्यांना दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले. बाकीच्यानाही जबर मार लागला होता. त्यांना ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासर्वांना बाहेर काढले.  पंधरा  मिनिटात अब्युलन्स त्या ठिकाणी पोचली. पोलिसही तात्काळ दाखल झाले. तोपर्यत सहाजणाचा जीव गेला होता.

 

● सांगोल्यातील अपघातात दोन ठार

सोलापूर : सांगोला तालुक्यातील चिकमहुद दिघंची रोडवर भरधाव टिपरने पाठीमागून दुचाकीला जोराची धडक दिली यात दोन जागीच ठार झाले आहेत. हा अपघात आज रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला.

या अपघातात दोन जण जागीच ठार एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सांगोला पोलिसांनी दिली आहे. सुशांत जाधव (रा. वरकुटे) व मंगेश पिसे (स. वरकुटे) असे अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.यावेळी सागर जावीर, वैभव वाघमारे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तत्काल १०८ या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले.

चिकमहूदजवळील धोकादायक वळणावरील एका हॉटेलसमोर घडला. घटनास्थळी सांगोला पोलिसांचे पथक दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. 

 

You Might Also Like

सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात

सोलापूर विद्यापीठाची परीक्षा १४ ऑक्टोबरपासून!

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

सोलापूरमधील व्यापार्‍याची दोन लाख 23 हजारांची ऑनलाईन फसवणूक

सोलापूर – मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सीओईपीतील नव्या इमारतीचे उद्घाटन

TAGGED: #Two #accidents #Solapur #Eight #killed #doctor #couple #Sangola #Mohol #Penur, #सोलापूर #दोन #अपघात #डॉक्टर #दाम्पत्य #आठ #ठार #मोहोळ #सांगोला #पेनूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा; पेट्रोल – डिझेल स्वस्त
Next Article मोहोळमध्ये शेतातून ५० डझन हापूस आंब्याची चोरी; सोलापुरात तरुणीची आत्महत्या

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?