: शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण येणार पुढे
: रात्री उशिरा मृतदेह सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल
: गळा चिरुन आत्महत्या केल्याचे अफवेने खळबळ
खास प्रतिनिधी
सोलापूर : नितीन माने-देशमुख (वय 48, रा. विनायक नगर तळेहिप्परगा ) या डॉक्टरच्या मृत्यूचे गुढ गुरुवारी रात्री 11 वाजेपर्यंत काम राहिले. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक झाला की त्यांनी आत्महत्या केली याबद्दलची ठोस माहिती समोर आली नाही. डॉ. माने-देशमुख यांचा मृतदेह रात्री 12 वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांसह जोडभावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सिव्हील हॉस्पीटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी आणला. त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे जोडभावी पोलिस ठाण्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान डॉ.नितीन माने-देशमुख यांनी गळा चिरुन घेऊन आत्महत्या केली अशी अफवा गुरुवारी (ता.20) रात्री सात-साडेसातनंतर पसरविली गेली. त्यामुळे तिळेहिप्परगा परिसरात एकच खळबळ माजली. रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान जोडीभावी पोलीस ठाण्यात घटनेसंबंधी निरोप आला. तद्नंतर या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी तातडीने पोचून सुक्ष्म पाहणी करत डॉ. माने-देशमुख यांच्या कुंटुंबातील सदस्यांकडून माहिती जाणून घेतली.
मृत नितीन माने-देशमुख हे (विनायक नगर तळेहिप्परगा) येथे वास्तव्यास होते. तिथे असलेल्या त्यांच्या घराच्या तळमजल्यावर त्यांचा दवाखाना आहे असून वरच्या मजल्यावर हे राहायला होते. वैद्यकीय व्यावसाय ते संबंधित ठिकाणी करीत होते. काल बुधवारी (ता.19) रात्री साडेदहा अकरा वाजण्याच्या दरम्यान ते आपल्या बेडरुमध्ये झोपायला गेले. आज गुरुवारी (ता.20) सायंकाळपर्यंत ते बेडरूममधून बाहेर आल्याचे दिसले नाही. त्यांच्या बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता. यादरम्यान गुरुवारी डॉ. माने-देशमुख यांच्या कुंटुंबातील सदस्यांनी बेडरुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना डॉक्टर मृत अवस्थेत दिसून आले. त्यांच्या मृतदेहाला मुंग्या लागल्याचे दिसून आले. डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे कळताच कुंटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या गळ्याला मुंग्या लागल्याने त्यांनी गळा चिरुन आत्महत्या केली असावी की काय? असा अंदाज बांधून काही बघ्यांनी तशी अफवा पसरवली. या परिसरातील गुरवारी सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत बघ्यांची गर्दी जमली होती.
कोट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. संबंधित मृत व्यक्तीची हालचाल दोन वाजेपर्यंत होती. तद्नंतर हालचाल थांबली, डॉक्टराचा मृतदेह ज्या रुममध्ये आढळून आला आहे, त्या खोलीमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. मृतदेहाला मुंग्या लागल्याचे दिसून आले. मृत व्यक्तीच्या गळ्याच्या भोवती मुंग्या आढळून आल्या. मात्र आत्महत्या वगैंरेचा प्रकार असावा असे वाटत नाही. मृत व्यक्तीकडून प्रतिसाद मिळेना झाल्यावर कुंटुंबातील सदस्यांनी दारे तोडून संबंधित खोलीत प्रवेश मिळविला. संबंधित मृत व्यक्तीला आजार होता. तो पाच-पाच दिवस जेवण नव्हता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून मिळाली. सकृत दर्शनी मृतदेहासंबंधी ही माहिती मिळाली. शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर घटनेची माहिती समोर येईल.
-सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, सोलापूर
रात्री दोन नंतर डॉक्टकरांच्या शरिराच्या थांबल्या हालचाली
वासूदेव नगरातील ज्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरच्या बेडरुममध्ये डॉ. नितीन माने-देशमुख झोपले होते. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जोडभावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपासले. रात्री साधारण दोन नंतर डॉ. माने-देशमुखांच्या शरिराच्या हालचाली पूर्णपणे थांबल्याच्या दिसतात. तत्पूर्वी झोपतेच त्यांच्या शरिराच्या काही हालचाली सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आल्या आहेत. त्यांचा मृत्यू गुरुवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास झाल्याचे यावरून स्पष्ट होते.
डॉ. माने-देशमुखांना ह्दविकारचा त्रास
साधारण 48 वर्षे वय असलेल्या डॉ. माने-देशमुख यांना मागील काही वर्षांपासून हदय विकाराचा तीव्र त्रास होता. ह्दय विकाराच्या झटक्याने झोपेत त्यांच्या मृत्यू झाला असावा, असाही अंदाज त्यांच्या मृत्यूबाबतीत व्यक्त करण्यात आला.