Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “जे स्वतःला वाचवू शकले नाही ते कसले डॉक्टर”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

“जे स्वतःला वाचवू शकले नाही ते कसले डॉक्टर”

Surajya Digital
Last updated: 2021/05/25 at 2:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना काळात कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांबाबत बाबा रामदेव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. योगसाधना करताना त्यांनी त्यांच्याबरोबर योग करणाऱ्यांशी गप्पा मारताना एक हजार डॉक्टर कोरोना लशीचे दोन्ही डोस घेऊनही मेले आहेत. जे स्वत:ला वाचवू शकले नाहीत ते कसले डॉक्टर, असं त्यांनी म्हटलं आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर आता टीका होत आहे.

'लसीचे पैसे आमचे सरकार देत आहेत मग आम्ही फोटो का लावू नये' https://t.co/IcECAs4I8t

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021

अ‍ॅलोपॅथीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा यांचा आणखीन एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी डॉक्टरांसंदर्भात वक्तव्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बाबा रामदेव यांच्या एका योग अभ्यास वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये रामदेव योगा करता करता योगसाधना करणाऱ्यांशी गप्पा मारताना दिसत आहेत. मात्र बोलता बोलता त्यांनी करोनाशी लढत असताना मरण पावलेल्या डॉक्टरांबद्दल वक्तव्य केलं असून आता हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एक हजार डॉक्टर कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतरही मेले आहेत, असं बाबा रामदेव या व्हिडीओत सांगताना दिसतात. जे लोक स्वत:ला वाचवू शकत नाहीत ते कसले डॉक्टर?, असा प्रश्नही बाबा रामदेव यांनी उपस्थित केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच रामदेव हे डॉक्टरांवर उपहासात्मक वक्तव्य करताना दिसतात. “तिसरा म्हणाला मला डॉक्टर व्हायचं आहे. टर…टर…टर…टर…टर…टर… डॉक्टर बनायचं आहे. एक हजार डॉक्टर तर आता कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर मरण पावले. किती डॉक्टर? एक हजार… कालची बातमी आहे. स्वत:लाच वाचवू शकत नाहीत हे कसले डॉक्टर”, असं रामदेव यांनी म्हटलं आहे.

'यास चक्रीवादळ' घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार https://t.co/OVmX2g6GpV

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021

पुढे बोलताना, “डॉक्टर बनायचं असलं तर स्वामी रामदेवसारखं बना. ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाहीय तरी ते सर्वांचे डॉक्टर आहेत. कोणत्याही पदवी शिवाय, दैवत्वाशिवाय मात्र प्रतिष्ठेसहीत मी एक डॉक्टर आहे,” असं रामदेव म्हणतात दिसतात.

“डॉक्टर तो टर टर टर करते रहते हैं
वैक्सीन की डबल डोज़ के बाद भी मर गए
जो खुद को न बचा पाए वो कैसे डॉक्टर हैं ?”

ये ढोंगी रामदेव का कहना है😡

अगर आप ऐसे पाखंड, निर्लज्जता और संवेदनशून्यता के खिलाफ़ हैं तो मोदी सरकार से डंके की चोट पर कहें #ArrestRamdev

https://t.co/b7sp6EtriZ

— Dr. Ragini Nayak (@NayakRagini) May 24, 2021

* काँग्रेसच्या प्रवक्त्यानी व्हिडिओ केला शेअर

काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर रागिनी नायक यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. नायक यांनी रामदेव यांचा उल्लेख ढोंगी असा केलाय. “जर तुम्ही अशा खोट्या, निर्लज्जपणे आणि संवेदनशून्य पद्धती बोलणाऱ्याविरोधात आहात तर मोदी सरकारला ओरडून सांगा की बाबा रामदेव यांना अटक करा,” असं नायक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

देशात म्युकरमायकोसिसचे 5, 424 रुग्ण, महाराष्ट्रात 130 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार https://t.co/X1MNzvzBpe

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #doctor #RamdevBaba #couldnot #savehimself, #स्वतःला #वाचवू #शकलेनाही #तेकसले #डॉक्टर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘लसीचे पैसे आमचे सरकार देत आहेत मग आम्ही फोटो का लावू नये’
Next Article ‘फ्लाईंग सिख’ मिल्का सिंग यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?